1 / 8‘डान्स दीवाने’ या शोचा जज आणि कोरिओग्राफर तुषार कालिया लवकरच ‘खतरों के खिलाडी 12’मध्ये दिसणार आहे. त्याआधी तुषारने एक गुड न्यूज चाहत्यांसोबत शेअर केली आहे.2 / 8होय, तुषारने गर्लफ्रेन्ड त्रिवेणी बर्मनसोबत साखरपुडा केला आहे. साखरपुड्याचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. शिवाय तुषारने त्रिवेणीसोबतचे काही फोटो शेअर केले आहेत.3 / 8यावर्षीच्या सुरूवातीला तुषारने त्रिवेणीसोबतचं रिलेशनशिप ऑफिशिअल केलं होतं. गत रविवारी तुषार व त्रिवेणीचा साखरपुडा पार पडला. नवी सुरूवात, असं कॅप्शन देत तुषारने त्याच्या लेडी लव्हसोबतचे फोटो शेअर केले आहेत.4 / 8फोटोत तुषार व त्रिवेणी दोघंही व्हाईट कलरच्या आऊटफिटमध्ये दिसत आहेत. दोघांनीही रोमॅन्टिक पोझ दिल्या आहेत. फोटोत दोघांची केमिस्ट्री स्पष्ट दिसते.5 / 8तुषारची होणारी पत्नी त्रिवेणी एक मॉडेल आहे. त्रिवेणीने 2017 मध्ये फेमिना मिस इंडियाचा खिताब जिंकला होता. 6 / 8त्रिवेणी सोशल मीडियावर प्रचंड अॅक्टिव्ह आहे. इन्स्टाग्रामवर स्वत:चे ग्लॅमरस फोटो ती शेअर करत असते. इन्स्टावर तिचे 7 लाख फॉलोअर्स आहेत.7 / 8 तर तुषार एक लोकप्रिय कोरिओग्राफर आहे. बॉलिवूडच्या अनेक चित्रपटांसाठी त्याने कोरिओग्राफर म्हणून काम केलं आहे.8 / 8ए दिल है मुश्किल, ओके जानू, हाफ गर्लफ्रेन्ड अशा अनेक चित्रपटांतील गाणी त्याने कोरिओग्राफ केली. डान्स दीवाने व इंडियाज गॉट टॅलेंज सारखे शो त्याने जज केले आहेत.