1 / 7'आभाळमाया' मालिका चांगलीच गाजली. या मालिकेतील सर्वच कलाकारांवर प्रेक्षकांनी प्रेम केलं. मालिकेत सुकन्या मोनेंची मुलगी अर्थात चिंगीची भूमिका खूप गाजली2 / 7चिंगीची भूमिका साकारली अभिनेत्री स्वरांगी मराठेने. गोड, निरागस अशी चिंगी सर्वांच्या मनात घर करुन गेली. बालपणात लोकप्रिय झालेल्या स्वरांगी मोठं झाल्यावरही अभिनय क्षेत्रात सक्रीय राहिली3 / 7स्वरांगी मराठेने पुढे स्वराज्यरक्षक संभाजी या मालिकेत आणि पोरबाजार या सिनेमात अभिनय केला. एका गोष्टीमुळे स्वरांगीची खूप चर्चा झाली. काय होतं कारण4 / 7स्वरांगी मराठेने २०१६ साली निखिल काळेसोबत लग्न केलं. स्वरांगी आणि निखिलच्या लग्नाची खूप चर्चा झाली. यामागचं कारण खास होतं5 / 7स्वरांगी आणि निखिलने कोणताही गाजावाजा न करता मराठमोळ्या पारंपरिक थाटात लग्न केलं. या दोघांनी लग्नात अवास्तव खर्च टाळला6 / 7लग्नामध्ये होणारा वाजवी आणि अनावश्यक खर्च टाळून स्वरांगी आणि निखिल यांनी पैसे वाचवून ते एका अनाथ आश्रमाला दान केले. स्वरांगीच्या या निर्णयाचं खूप कौतुक झालं होतं7 / 7मनोरंजन विश्वातील सेलिब्रिटी लग्नात मोठा खर्च करतात. पण स्वतःच्या लग्नातला खर्च वाचवून स्वरांगीने तो निधी दान करुन तिने सर्वांसमोर एक आदर्श निर्माण केला.