Join us
Daily Top 2Weekly Top 5

राहतं घर गेलं, रेस्टॉरंटही बंद पडलं; 2 वर्ष अभिनेत्याला करावा लागला आर्थिक संकटाचा सामना

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2023 10:37 IST

1 / 10
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेता म्हणजे अविनाश सचदेव.
2 / 10
छोटी बहु या मालिकेच्या माध्यमातून अविनाशला खऱ्या अर्थाने ओळख मिळाली.
3 / 10
अविनाशने अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. मात्र, मध्यंतरी त्याच्यावर मोठं आर्थिक संकट कोसळलं होतं.
4 / 10
अलिकडेच त्याने 'बिग बॉस ओटीटी 2'मध्ये सहभाग घेतला असून या शोमध्ये त्याने २ वर्ष कशाप्रकारे आर्थिक नुकसान सहन करावं लागलं हे सांगितलं.
5 / 10
२०१९ मध्ये अविनाशने मुंबईत एक पॅन-आशियाई रेस्टॉरंट सुरु केलं. परंतु, त्याला या बिझनेसमध्ये लॉस झाला. ज्यानंतर त्याला आर्थिक संकटाचा सामना करावा लागला.
6 / 10
२०१९ मध्ये अविनाशने मुंबईत एक पॅन-आशियाई रेस्टॉरंट सुरु केलं. परंतु, त्याला या बिझनेसमध्ये लॉस झाला. ज्यानंतर त्याला आर्थिक संकटाचा सामना करावा लागला.
7 / 10
सध्या अविनाश एका लहानशा अपार्टमेंटमध्ये भाड्याने राहत आहे.
8 / 10
“2019 मध्ये मी मुंबईत एक पॅन-आशियाई रेस्टॉरंट सुरू केलं होतं. अभिनयासह मला स्वत:चा एक बिझनेसही सुरु करायचा होता”, असं त्याने सांगितलं.
9 / 10
पुढे तो म्हणतो, “2020 मध्ये कोरोना महामारी आली आणि काही महिन्यांमध्येच मला माझं रेस्टॉरंट बंद करावं लागलं. या रेस्टॉरंटसाठी मी कर्ज घेतलं होतं. हे कर्ज फेडण्यासाठी माझ्यासमोर एकच पर्याय होता ते म्हणजे राहतं घर विकणं.
10 / 10
दरम्यान, राहतं घर विकल्यानंतर अविनाश एका भाड्याच्या घरात राहतोय. इतकंच नाही तर कलाविश्वातही त्याला फारसं काम मिळत नसल्याचं दिसून येत आहे.
टॅग्स :टेलिव्हिजनसेलिब्रिटी