Join us
Daily Top 2Weekly Top 5

BBM 6: आयुष संजीवची गर्लफ्रेंड आहे 'ही' मराठी अभिनेत्री? लोकप्रिय हिंदी मालिकेत केलंय काम

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2026 12:58 IST

1 / 9
'बिग बॉस मराठी'च्या सहाव्या सीझनमध्ये सहभागी झालेला अभिनेता आयुष संजीव चर्चेत आहे. तन्वी कोलतेसोबत त्याचं जुळतंय की काय अशी प्रेक्षकांमध्ये चर्चा आहे.
2 / 9
तन्वीच्या मनात आयुषसाठी जागा असल्याचं तिने वेळोवेळी दाखवलं आहे. गेल्या भाऊचा धक्कावर तन्वीने रितेशसमोरच आयुषला रडत रडत मारल्याचं सगळ्यांनी पाहिलं. तर आयुषने मात्र माझ्याकडून काहीही अपेक्षा ठेवू नको असं स्पष्ट सांगितलं.
3 / 9
यावरुन तन्वीचं प्रेम हे एकतर्फी आहे असं चित्र दिसत आहे. तर दुसरीकडे आयुष संजीवची बाहेर गर्लफ्रेंड असल्याची आता चर्चा आहे. कोण आहे ही आयुषची गर्लफ्रेंड?
4 / 9
ही आहे चिन्मयी साळवी. सोनी सब वाहिनीवरील 'वागळे की दुनिया' ही मालिका गाजली होती. या मालिकेत सखी वागळेच्या भूमिकेत अभिनेत्री चिन्मयी साळवी दिसली होती.
5 / 9
चिन्मयीला या मालिकेने ओळख मिळवून दिली. चिन्मयी आणि आयुष एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा तेव्हा रंगल्या होत्या.
6 / 9
मात्र दोघांनीही कधीच त्यांचं रिलेशनशिप मान्य केलं नाही. आता आयुष बिग बॉसमध्ये असल्याने चिन्मयीचं नाव पुन्हा चर्चेत आलं आहे.
7 / 9
चिन्मयी आणि आयुषचे काही फोटो सोशल मीडियावर आहेत. या फोटोंमध्ये दोघं एकमेकांसोबत खूप आनंदी दिसत आहेत. त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद स्पष्ट दिसत आहे.
8 / 9
'वागळे का दुनिया' शिवाय चिन्मयी 'तू माझा सांगाती', 'छोटी मालकीन' या मालिकांमध्ये दिसली. तसंच 'ये रे ये रे पावसा' सिनेमातही ती होती.
9 / 9
चिन्मयी उत्तम डान्सरही आहे. 'दम दमा दम', 'फूल टू धमाल', 'ढोलकीच्या तालावर' या कार्यक्रमांमध्ये तिने सहभाग घेतला आहे.
टॅग्स :बिग बॉस मराठी ६मराठी अभिनेतारिलेशनशिप