1 / 10गेल्या 20 आठवड्यांपूर्वी सुरु झालेल्या या सीझनला अखेर विजेता मिळाला आहे. राहुल वैद्य आणि रुबीना दिलैक यांच्यात शेवटपर्यंत काँटे की टक्कर बघायला मिळाली.2 / 10रुबीना दिलैकने बाजी मारत बिग बॉस 14व्या सीझनची विजेता ठरली आहे.3 / 10रुबीनाने छोटी बहू या मालिकेद्वारे तिच्या अभिनयकारकिर्दीला सुुरुवात केली.4 / 10सास बिना ससुराल या मालिकेत देखील ती झळकली होती. 5 / 10देवों के देव महादेव, पुर्नविवाह, जीनी और जूजू या तिच्या मालिका चांगल्याच गाजल्या आहेत.6 / 10रुबीनाला तिच्या अभिनयासाठी अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. 7 / 10अभिनेता अभिनव शुक्लाची ती पत्नी असून तो देखील तिच्यासोबत बिग बॉसच्या घरात होता. 8 / 10बिग बॉसच्या घरात असताना राखी सावंत अभिनवच्या प्रेमात पडल्याने अनेकवेळा राखी आणि रुबीना यांच्यात वाद झाला होता. 9 / 10विजेती ठरल्यानंतर रूबीनाने इन्स्टाग्रामवर लाईव्ह येत चाहत्यांचे आभार मानले10 / 10बिग बॉसच्या घरात रूबीनाने तिचा पती अभिनव शुक्लासोबत एन्ट्री घेतली होती. बिग बॉसच्या घरात गेलेत, तेव्हा या कपलच्या वैवाहिक आयुष्यात फार काही ठीक नव्हते. अगदी दोघेही घटस्फोटाच्या निर्णयापर्यत पोहोचले होते. पण बिग बॉसच्या घरात एकत्र राहताना दोघांमधील मतभेद दूर झालेत.