1 / 10‘बिग बॉस 14’मध्ये एन्ट्री घेताच सिंगर सारा गुरपाल वादात सापडली आहे. काल बिग बॉस प्रीमिअरमध्ये आपण सिंगल असल्याचे साराने सांगितले होते. पण आता साराची हा दावा खोटा असल्याचे समोर येत आहे. सारा सिंगल नसून विवाहित असल्याचा दावा पंजाबी सिंगर तुषार कुमारने केला आहे.2 / 10सारा ही आपली पत्नी आहे. 2014 मध्ये आमचे लग्न झाले होते, असे तुषार कुमारने म्हटले आहे. विशेष म्हणजे, पुराव्यादाखल त्याने सारा व त्याचे काही फोटो शिवाय मॅरेज सर्टिफिकेटही शेअर केले आहे.3 / 10तुषारने सांगितले की, सारा व माझे लग्न 16 आॅगस्ट 2014 रोजी जालंधर येथे झाले. सारा तिच मुलगी आहे, जिच्यासोबत मी लग्न केले होते. आता ती जगापुढे खोटे बोलतेय. सिंगल असल्याचे सांगते आहे.4 / 10तुषारने सारासोबतचा फोटोही शेअर केला आहे. यात साराच्या भांगात कुंकू आहे. हातात लग्नाचा चुडा आहे.5 / 10आत्ताच लग्नाबद्दल खुलासा का केला? असे विचारले असता तो म्हणाला, आता मला व्हॉट्सअॅप व इन्स्टाग्रामवर जगभरातील लोकांचे संदेश येत आहेत. सारा लग्न नाकारते आहे. तुझे लग्न माझ्याशी नाही तर माझ्या सारख्या दिसणाºया मुलीशी झाले होते, असा दावा सारा करतेय. पण ती खोटे बोलतेय.6 / 10माझे लग्न सारासोबतच झाले होते. मी लग्न केले, ती साराच होती, असा दावाही तुषारने केला आहे.7 / 10तिने फक्त पैशांसाठी व युएसएचे नागरिकत्व मिळवण्यासाठी माझ्याशी लग्न केले, असे मला वाटते. पण माझ्याकडून तिला कोणतीही पब्लिसिटी मिळत नसल्याचे पाहून मला सोडून दिले, असा आरोपही तुषाने केला.8 / 10सारा ही एक पंजाबी मॉडेल, सिंगर व अभिनेत्री आहे. ती एक डान्सरही आहे.9 / 102012 मध्ये तिने ‘मिस चंदीगड’चा किताब जिंकला होता. 2017 मध्ये डेंजर डॉक्टर जेली या पंजाबी सिनेमातून तिने तिच्या अॅक्टिंग करिअरची सुरुवात केली होती.10 / 10सारा सोशल मीडियावर प्रचंड अॅक्टिव्ह आहे. रोज नवे फोटो व व्हिडीओ ती शेअर करत असते.