Join us  

भारती सिंगचं बाळ आहे तिच्याप्रमाणे गुबगुबीत, चिमुकल्या लक्ष्यचे क्युट फोटो आले समोर

By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2022 8:49 PM

1 / 9
कॉमेडी क्वीन भारती सिंग आणि हर्ष लिंबाचिया यांची जोडी प्रेक्षकांना खूप भावते. हर्ष आणि भारतीचे प्रेमच नाही तर या जोडप्याचे मजेशीर जोक्सही चाहत्यांना आवडतात.
2 / 9
एप्रिलमध्ये हर्ष आणि भारतीच्या घरी छोट्या पाहुण्याचे आगमन झाले होते आणि बऱ्याच दिवसांनंतर या जोडप्याने मुलाचे नाव जाहीर केले.
3 / 9
पण चेहरा दाखवला नव्हता. मात्र आता या जोडप्याने चाहत्यांना मुलाचा चेहरा दाखवला आहे.
4 / 9
हर्ष लिंबाचिया आणि भारती सिंगने बाळाचे नाव लक्ष्य ठेवले आहे. हे नाव चाहत्यांना खूप आवडले आहे.
5 / 9
हर्ष लिंबाचिया आणि भारती सिंग यांनी नुकताच एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला होता. त्यानंतर आता त्यांनी सोशल मीडियावर बाळाचे फोटो शेअर केले आहेत.
6 / 9
लक्ष्यचे क्युट फोटोशूट केले आहे. या फोटोंना चाहत्यांची खूप पसंती मिळताना दिसत आहे.
7 / 9
लक्ष्यचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.
8 / 9
३ डिसेंबर २०१७ रोजी हर्ष आणि भारती विवाहबंधनात अडकले. यानंतर भारती सिंगने ३ एप्रिल २०२२ रोजी चाहत्यांना खुशखबर दिली.
9 / 9
भारती आणि हर्ष मुलाला प्रेमाने गोला म्हणतात आणि चाहते गोलाच्या पहिल्या झलकसाठी खूप दिवसांपासून उत्सुक होते.
टॅग्स :भारती सिंग