Join us

PHOTOS : अंकिता लोखंडेनं बाथरूममध्ये केलं फोटोशूट, दिल्या एकापेक्षा एक झक्कास पोझ

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2022 12:21 IST

1 / 8
‘पवित्र रिश्ता’ या लोकप्रिय मालिकेतून घराघरात पोहचलेली अभिनेत्री अंकिता लोखंडे या ना त्या कारणाने चर्चेत असते.
2 / 8
अभिनयाशिवाय तिची स्टाईल, तिचे सोशल मीडियावरचे फोटो, व्हिडीओ सतत चर्चेत असतात. सध्या चर्चा आहे ती तिच्या फोटोशूटची.
3 / 8
अंकिता सोशल मीडियावर प्रचंड अ‍ॅक्टिव्ह आहे. वेगवेगळ्या लूक आणि कपड्यांमधील फोटो ती सोशल मीडियावर शेअर करत असते. आता तिने नवे फोटो शेअर केले आहेत.
4 / 8
होय, अंकिता लोखंडेने चक्क बाथरूममध्ये एक फोटोशूट केलं आहे. या फोटोशूटचे फोटो तिने इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत.
5 / 8
निळ्या रंगाची डेनिमवर निळं टॉप आणि निळ्या रंगाच्या जॅकेटमध्ये तिने झक्कास पोझ दिल्या आहेत. फोटोत शिमरी हाय हिल्स घातलेल्या दिसत आहेत.
6 / 8
अंकिताने बाथटबमध्ये बसूनही पोझ दिल्या आहेत. या फोटोंमध्ये अंकिता खूपच सुंदर दिसतेय.
7 / 8
अंकिताचे हे फोटो तुफान व्हायरल होत आहेत. चाहत्यांनी तिच्या या फोटोचं चांगलंच कौतुक केलं आहे. तुझ्यासारखी सुंदर तुच, अशा अनेक कमेंट्स तिच्या या फोटोंवर पाहायला मिळत आहेत.
8 / 8
मध्यंतरी अंकिता प्रेग्नंट असल्याची चर्चा होती. अर्थात अद्याप अंकिता यावर काहीही बोललेली नाही. गतवर्षी डिसेंबर महिन्यात तिने बॉयफ्रेन्ड विकी जैनसोबत लग्न केलं.
टॅग्स :अंकिता लोखंडे