Join us

पन्नाशीनंतरही तरूणींना लाजवेल असा ऐश्वर्या नारकर यांचं सौंदर्य आणि फिटनेस, लेटेस्ट फोटो चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2025 16:36 IST

1 / 8
अभिनेत्री ऐश्वर्या नारकर हे मराठी कलाविश्वातील असं नाव आहे, ज्यांनी नाटक, मालिका, चित्रपट या माध्यमात काम केले आहे. शेवटच्या त्या झी मराठीवरील 'सातव्या मुलीची सातवी मुलगी' या मालिकेत खलनायिकेच्या भूमिकेत पाहायला मिळाल्या होत्या.
2 / 8
ऐश्वर्या नारकर सोशल मीडियावरही सक्रीय असतात. विविध ट्रेंडिंग रील्स असो किंवा फिटनेससंदर्भातील व्हिडीओ त्या शेअर करतात आणि त्यांच्या कंटेटला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत असतो.
3 / 8
ऐश्वर्या नारकर त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर विविध फोटोशूटही शेअर करतात. या फोटोशूटमधून त्यांचे साडीप्रेम विशेष पाहायला मिळते.
4 / 8
आताही त्यांनी शेअर केलेला एक फोटो खूप चर्चेत आला आहे. यात त्या खूपच ग्लॅमरस दिसत आहेत.
5 / 8
ऐश्वर्या यांनी वयाची पन्नाशी उलटली असली तरी त्यांचा फिटनेस आणि सौंदर्य तरूणाईला लाजवेल असा आहे.
6 / 8
ऐश्वर्या नारकर यांच्या या फोटोला चाहत्यांची खूप पसंती मिळत आहे. चाहतेच नाही तर सेलिब्रेटींनीही फोटोवर कमेंट केलीय.
7 / 8
ऐश्वर्या नारकर यांनी हिंदी आणि मराठी मालिकांमध्ये काम केलं आहे.
8 / 8
'या सुखांनो या', 'स्वामिनी', 'लेक माझी लाडकी', 'श्रीमंतघरची सून', 'ये प्यार ना होगा कम', 'घर की लक्ष्मी बेटियां' या हिंदी-मराठी मालिकांमध्ये त्यांनी काम केलं आहे.
टॅग्स :ऐश्वर्या नारकर