Sonarika Bhadoria : "त्याने माझा पाठलाग केला, २५ नंबरवरुन मला कॉल केले, घाणेरडे मेसेज पाठवले, धमकी दिली"
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2025 13:52 IST
1 / 10अभिनेत्री सोनारिका भदौरियाने 'देवों के देव... महादेव' मध्ये पार्वतीची भूमिका साकारली आहे. आता तिने एक धक्कादायक खुलासा केला. 2 / 10सोनारिकाने सांगितलं की, 'एक माणूस तिचा गेल्या कित्येक महिन्यांपासून पाठलाग करत होता. त्याने घाणेरडे मेसेज पाठवले. यानंतर तिने तक्रार केल्यावर त्याला अटक करण्यात आली आहे.'3 / 10'तो साठ-आठ महिन्यांपासून मला वारंवार मेसेज आणि फोन करत होतो. मी त्याचे सततचे मेसेज पाहून वैतागली आणि घाबरली होती.'4 / 10'जेव्हा मी त्याचा नंबर ब्लॉक केला तेव्हा त्याने माझ्याची कॉन्टॅक्ट करण्यासाठी दुसऱ्या नंबर्सचा वापर केला. त्याने २५ नंबरवरून मला कॉन्टॅक्ट केला, कॉल केले.' 5 / 10'काही दिवसांसाठी मी माझा फोन बंद केला. तेव्हा त्याने माझे वडील आणि नातेवाईकांना कॉल करण्यास सुरुवात केली.'6 / 10'सुरुवातीला मी दुर्लक्ष केलं आणि नंतर पोलिसांशी संपर्क साधून तक्रार केली. पोलिसांनी त्याची चौकशी केली.' 7 / 10'तरुणाने पोलिसांना सांगितलं की, त्याला माझ्याशी लग्न करायचं होतं. पण मी लग्नास नकार दिल्यानंतर तो आत्महत्येची धमकी देऊ लागला.' 8 / 10'एका सॉफ्टवेअरच्या मदतीने त्याने माझा नंबर मिळवला होता' असं सोनारिकाने म्हटलं आहे. २०१७ मध्ये ही घटना घडली होती. 9 / 10सोनारिका भदौरियाने २०२४ मध्ये तिच्या बॉयफ्रेंडसोबत लग्नगाठ बांधली आहे. 10 / 10