Join us

बाळजाबाईच्या लेकी खूप हुशार! एक मुलगी Google मध्ये करते नोकरी, तर दुसरी...

By देवेंद्र जाधव | Updated: August 3, 2025 12:24 IST

1 / 7
सध्या स्टार प्रवाहवर 'हळद रुसली आणि कुंकु हसलं' ही मालिका सुरु आहे. समृद्धी केळकर आणि अभिषेक रहाळकर या कलाकारांच्या मालिकेत प्रमुख भूमिका आहेत. याच मालिकेत बाळजाबाईची भूमिका अभिनेत्री पूजा पवार साळुंखे साकारत आहेत.
2 / 7
'हळद रुसली आणि कुंकु हसलं' मालिकेतील पूजा पवार यांना बाळजाबाईच्या भूमिकेमुळे खूप लोकप्रियता मिळाली. पूजा यांचं खऱ्या आयुष्यात लग्न झालं असून त्यांना दोन मुली आहेत.
3 / 7
पूजा यांच्या लेकी अत्यंत हुशार असून त्या करिअरमध्ये यशस्वी झाल्या आहेत. पूजा यांच्या मुलीचं नाव आहे अतिशा आणि नताशा. दोन्ही लेकी पूजा यांच्याप्रमाणेच दिसायला सुंदर आहेत
4 / 7
पूजा यांच्या लेकी करिअरमध्ये प्रगतीपथावर आहे. त्यांची लेक नताशा ही थेट गुगलमध्ये काम करत आहे. याशिवाय त्यांची दुसरी मुलगी अतिशा ही मॉडेलिंग क्षेत्रात कार्यरत आहे.
5 / 7
पूजा यांचा त्यांच्या दोन्ही मुलींच्या करिअरमध्ये खूप सपोर्ट आहे. आईचा भक्कम पाठिंबा असल्याने पूजा यांच्या दोन्ही मुली यशस्वी कामगिरी करत आहेत.
6 / 7
पूजा पवार साळुंखे या अनेक वर्षांपासून मराठी मनोरंजन विश्वात कार्यरत आहेत. त्यांनी झपाटलेला, एक होता विदुषक यांसारख्या सिनेमांमध्ये काम केलंय.
7 / 7
पूजा पवार यांनी लक्ष्मीकांत बेर्डे, निवेदिता सराफ, अजिंक्य देव यांसारख्या दिग्गजांसोबत काम केलंय. पूजा सध्या मराठी मालिकेत विविध भूमिका साकारत आहेत
टॅग्स :लक्ष्मीकांत बेर्डेअजिंक्य देवटेलिव्हिजनमराठी चित्रपटमराठी अभिनेता