By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2026 16:17 IST
1 / 9रविवारी अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या फायनलमध्ये भारताने न्यूझीलंडवर मात करत टी २० वर्ल्डकप नावावर केला. तर दुसरीकडे एका इंडियन क्रिकेटरने गुडन्यूज दिली आहे. 2 / 9इंडियन क्रिकेटर पृथ्वी शॉने गुपचूप साखरपुडा केला आहे. पृथ्वी शॉने गर्लफ्रेंड आकृती अग्रवालसोबत साखरपुडा केला आहे. 3 / 9पृथ्वी शॉ आणि आकृतीने सोशल मीडियावर फोटो शेअर करत त्यांच्या साखरपुड्याबद्दल चाहत्यांना माहिती दिली. 4 / 9आकृती ही लोकप्रिय सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहे. तिचे इन्स्टाग्रामवर ३.२ मिलियन फॉलोवर्स आहेत. 5 / 9तिचं युट्यूब चॅनेलही आहे. याशिवाय आकृती लवकरच अभिनयातही पदार्पण करत आहे. 6 / 9आकृती त्रिमुखा या तेलुगु सिनेमातून पदार्पण करत आहे. लवकरच तिचा हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. 7 / 9आकृती अग्रवाल ही २२ वर्षांची असून ती २ मे २००३ रोजी तिचा जन्म झाला होता. तिने बीएमएसचं शिक्षण घेतलं आहे. 8 / 9पृथ्वी शॉ आणि आकृती अग्रवाल बऱ्याच दिवसांपासून एकमेकांसोबत डेट करत होते. आता ते लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत. 9 / 9आकृती आणि पृथ्वी शॉमध्ये ४ वर्षांचं अंतर आहे. पृथ्वी शॉ २६ वर्षांचा आहे तर आकृती २२ वर्षांची आहे.