जणू अप्सराच! अपूर्वा नेमळेकरचं आरस्पानी सौंदर्य; दिवाळीनिमित्त केलं खास फोटोशूट
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2024 12:48 IST
1 / 8अपूर्वा नेमळेकर ही मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. 2 / 8झी मराठी वाहिनीवरील ‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेत तिने 'शेवंता' नावाचं पात्र साकारलं होतं. या मालिकेद्वारे ती घराघरात पोहोचली. 3 / 8शेवंताच्या अदांनी फक्त अण्णाच नाही तर लाखो जण घायाळ झाले होते. याचबरोबर ती 'बिग बॉस मराठी'च्या चौथ्या पर्वात सहभागी झाली होती.4 / 8सध्या अभिनेत्री ‘प्रेमाची गोष्ट’ या मालिकेत खलनायिकेची भूमिका साकारताना दिसते आहे. 5 / 8अपूर्वा सोशल मीडियावर सक्रीय असून नुकतंच तिने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर खास दिवाळीच्या निमित्ताने काही फोटो पोस्ट केले आहेत.6 / 8फोटोंमध्ये दाक्षिणात्य लूकमध्ये अभिनेत्री खूपच सुंदर दिसते आहे. शिवाय टेम्पल ज्वेलरीने अभिनेत्रीच्या सौंदर्यात आणखी भर पडली आहे. 7 / 8अभिनेत्रीचे हे फोटो नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरले आहेत. 8 / 8अपूर्वा नेमळेकरने ‘आभास हा’ या मालिकेतून कलाविश्वामध्ये पदार्पण केलं होतं. त्यानंतर ‘आराधना’, ‘एकापेक्षा एक’ या मालिकांमध्ये ती झळकली आहे.