Join us
Daily Top 2Weekly Top 5

टेलिव्हिजनवरील अभिनेत्रीने पतीला गर्लफ्रेंडसोबत पकडलं रंगेहाथ, वर्षभरात मोडला संसार, आता जगतेय सिंगल लाइफ

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2024 15:04 IST

1 / 10
जेनिफर विंगेट ही टीव्ही जगतातील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. आतापर्यंत तिने विविध भूमिका साकारल्या आहेत. 'बेहद'मधील तिने साकारलेले ग्रे शेड कॅरेक्टर लोकांना खूप आवडले.
2 / 10
जेनिफर विंगेटने 'दिल मिल गये', 'बेहद', 'कहीं तो होगा' आणि 'बेपनाह' सारख्या लोकप्रिय टीव्ही मालिकांमध्ये काम करून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.
3 / 10
जेनिफरचे व्यावसायिक जीवन खूप चांगले राहिले आहे, परंतु तिच्या वैयक्तिक आयुष्यात अभिनेत्रीला खूप अडचणींचा सामना करावा लागला आहे.
4 / 10
जेनिफर विंगेटने तिच्या आयुष्यातील कठीण प्रसंगांचा सामना केला तरीही तिने कधीही हार मानली नाही आणि आज जेनिफर सर्वाधिक कमाई करणाऱ्या टीव्ही अभिनेत्रींपैकी एक आहे. तिने अनेक हिट शोमध्ये काम केले आहे.
5 / 10
मालिकेच्या सेटवरच ती करण सिंग ग्रोव्हरला भेटली होती. त्यानंतर अभिनेत्रीने तिच्या नात्याला नाव दिले होते. मात्र, त्यांचे नाते वर्षभरही टिकले नाही आणि करण-जेनिफर एकमेकांपासून वेगळे झाले.
6 / 10
जेनिफरने करण सिंग ग्रोव्हरला त्याच्या मैत्रिणीसोबत रंगेहात पकडले होते, असे म्हटले जाते. यानंतर अभिनेत्रीने सर्वांसमोर करणला थापडही मारली. पतीकडून फसवणूक झाल्यामुळे जेनिफर खूपच तुटली होती.
7 / 10
यानंतर १० महिन्यांत जेनिफर आणि करणचा घटस्फोट झाला. करणच्या विश्वासघातानंतर अभिनेत्रीला तिच्या आयुष्यात कोणीही जोडीदार मिळाला नाही. तरी जेनिफर सिंगल राहून तिच्या आयुष्याचा आनंद घेत आहे.
8 / 10
सिद्धार्थ काननला दिलेल्या मुलाखतीत तिने तिच्या घटस्फोटाबाबत सांगितले होते. ती म्हणाली होती की, 'त्यावेळी मी इतकी हरवली होती की लोकांना काय सांगावे आणि त्यावर कसे वागावे हेच कळत नव्हते. मला आठवते की माझे मित्र मला बाहेर जाण्यास भाग पाडायचे आणि मला कुठेही जायचे नसायचे.
9 / 10
जेनिफर विंगेटला टीव्हीची क्वीन म्हटले जाते. इंस्टाग्रामवर तिचे १८.१ मिलियन फॉलोअर्स आहेत.
10 / 10
आज ती सर्वाधिक मानधन घेणाऱ्या टीव्ही अभिनेत्रींपैकी एक आहे, जेनिफर एका एपिसोडसाठी १.५ लाख रुपये घेते आणि तिची एकूण संपत्ती ४२ कोटी रुपये आहे.
टॅग्स :जेनिफर विगेंटकरण सिंग ग्रोव्हर