Join us
Daily Top 2Weekly Top 5

'तारक मेहता..'मध्ये माधवी भिडे विकत असलेल्या लोणचं अन् पापडाची किंमत किती माहितीये?

By देवेंद्र जाधव | Updated: June 23, 2025 13:57 IST

1 / 7
'तारक मेहता का उलटा चष्मा' ही मालिका गेली अनेक वर्ष प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. या मालिकेतील सर्वच व्यक्तिरेखांवर प्रेक्षकांनी प्रेम केलं. 'तारक मेहता का उलटा चष्मा' अशीच एक व्यक्तिरेखा म्हणजे माधवी भिडे.
2 / 7
माधवी भिडे आणि आत्माराम तुकाराम भिडे हे मराठमोळं जोडपं गोकुलधाम सोसायटीमध्ये राहत असतं. यापैकी आत्माराम हे ट्यूशन क्लास घेतात. तर माधवीचा पापड-लोणच्याचा व्यवसाय असतो
3 / 7
माधवी भिडे या कुटुंबाला आर्थिक हातभार लावण्यासाठी घरबसल्या पापड आणि लोणच्याचा व्यवसाय करताना दिसतात. माधवी भिडे विकत असलेल्या या पदार्थांची किंमत किती याचा विचार तुम्ही केलाय.
4 / 7
'तारक मेहता का उलटा चष्मा'मधील एका भागात भागात याचं उत्तर सापडलं होतं. जेव्हा आत्माराम भिडे माधवी विकत असलेल्या पापड आणि लोणच्याची किंमत एका ग्राहकाला सांगत असतो.
5 / 7
'तारक मेहता का उलटा चष्मा'च्या १८७० एपिसोडमध्ये माधवी भिडे ५ किलो पापड आणि लोणचं ४७०० रुपयांना विकताना दिसते. तर एक किलो पापड-लोणचं भिडे दाम्पत्य ९४० रुपयांना विकताना दिसतात.
6 / 7
अशाप्रकारे भिडे कुटुंब जे पापड आणि लोणचं विकतं, त्याची किंमत या एपिसोडमध्ये पाहायला मिळते. अशाप्रकारे हा मजेशीर शोध 'तारक मेहता का उलटा चष्मा'च्या चाहत्यांनी लावला आहे.
7 / 7
गेल्या १६ वर्षांपासून 'तारक मेहता का उलटा चष्मा' मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करतेय. सोनालिका जोशीने माधवी भिडेची व्यक्तिरेखा साकारली असून मंदार चांदवडकरने आत्माराम भिडेची भूमिका साकारली आहे.
टॅग्स :तारक मेहता का उल्‍टा चश्‍मामंदार चांदवडकरटेलिव्हिजनमराठी अभिनेता