'आई आणि बाबा रिटायर होत आहेत' मधील 'स्वीटी'बद्दल या गोष्टी माहित आहेत का?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2025 17:43 IST
1 / 7'आई आणि बाबा रिटायर होत आहेत' मालिकेतील स्वीटीची सध्या चांगलीच चर्चा आहे. स्वीटीची भूमिका साकारली आहे अभिनेत्री पालवी कदमने2 / 7'आई आणि बाबा रिटायर होत आहेत' मालिकेतील पालवी कदम आणि आदिश वैद्य या दोघांची जोडी प्रेक्षकांना सध्या आवडतेय.3 / 7पालवी कदमने याआधी झी मराठीवरील 'सारं काही तिच्यासाठी' मालिकेत काम केलं होतं. या मालिकेत तिने चारुलता ही भूमिका साकारलेली4 / 7सेंट कोलंबिया गर्ल्स स्कूलमधून पालवी कदमने शालेय शिक्षण घेतलं असून सिडनहॅम कॉलेजमधून तिने महाविद्यालयीन शिक्षण घेतलंय5 / 7पालवीने बी.कॉम इन फॉरेन ट्रेड या विषयात पदवी मिळवली आहे. पालवीला लहानपणापासूनच मनोरंजन क्षेत्राची आवड असल्याचं दिसतं6 / 7पालवीने अनेक म्यूझिक व्हिडीओमध्ये अभिनय केलाय. याशिवाय विविध ब्रँडच्या जाहिरातींसाठी मॉडेल म्हणूनही काम केलंय7 / 7'आई आणि बाबा रिटायर होत आहेत' मालिकेत पालवी कदमने साकारलेली स्वीटी सर्वांचं मन जिंकून गेलीय. पालवीच्या अभिनयाचं सगळीकडे कौतुक होतंय