In Pics: अलविदा सुशांत...! या बॉलिवूड कलाकारांनी आपल्या लाडक्या मित्राला दिला अखेरचा निरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2020 18:02 IST
1 / 10शांतला अखेरचा निरोप देण्यासाठी त्याचे जवळचे मित्र आणि टीव्ही कलाकार स्मशानभूमीत दाखल झाले होते. 2 / 10अभिनेत्री श्रद्धा कपूर, अभिनेता अर्जुन बिजलानी हे येथे पोहोचले होते. छिछोरे या चित्रपटात श्रद्धा कपूरने सुशांतसोबत काम केले होते.3 / 10छिछोरे चित्रपटात त्याच्यासोबत काम करणारा अभिनेता वरुण शर्मादेखील आपल्या को-स्टारला अलविदा करायला पोहोचला होता.4 / 10दिग्दर्शक अभिषेक कपूर पत्नीसोबत स्मशानभूमीत दाखल झाले होते. 5 / 10अभिनेत्री कृति सेनन ही सुद्धा यावेळी दिसली. कधी काळी तिच्यासोबत सुशांतचे नाव जोडले गेले होते.6 / 10स्मशानभूमीच्या बाहेर रस्त्याच्या दुतर्फा चाहत्यांनी आपल्या लाडक्या अभिनेत्याला अलविदा करण्यासाठी गर्दी केली होती.7 / 10सुशांतचे वडील केके सिंह, मोठी बहीण आणि चुलतभाऊ आमदार नीरज कुमार हे यावेळी हजर होते.8 / 1014 जून रोजी सुशांतने त्याच्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. 9 / 10 विवेक ओबेरॉय यानेही सुशांतला अखेरचा निरोप दिला.10 / 10मुंबईत पाऊस असूनदेखील स्मशानभूमीच्या बाहेर रस्त्याच्या दुतर्फा चाहत्यांनी आपल्या लाडक्या अभिनेत्याला अलविदा करण्यासाठी गर्दी केली होती.