Join us  

Subodh Bhaveचा थोरला लेक आहे डॅशिंग आणि हॅण्डसम, नुकताच झाला १६ वर्षांचा, पाहा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2022 12:24 PM

1 / 13
अभिनेता सुबोध भावेने विविध भूमिका साकारून रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविले आहे.
2 / 13
सुबोध भावे सोशल मीडियावर सक्रीय असून तो या माध्यमातून चाहत्यांना अपडेट देत असतो. तसेच फोटो शेअर करत असतो.
3 / 13
सुबोध भावे बऱ्याचदा सोशल मीडियावर पत्नी मंजिरी भावे आणि मुलांसोबतचे फोटो शेअर करत असतो. त्याच्या फोटोंना चाहत्यांची पसंतीदेखील मिळताना दिसते.
4 / 13
आज सुबोध आणि मंजिरी भावे यांचा थोरला मुलगा कान्हाचा १६वा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने सुबोधने सोशल मीडियावर त्याच्यासोबतचा फोटो शेअर करून त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
5 / 13
सुबोधने मुलासोबतचा फोटो शेअर करत लिहिले की, कान्हा आज १६ वर्षांचा झाला. कान्हा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. खूप खूप प्रेम.
6 / 13
कान्हाला फुटबॉल खेळाची खूप आवड आहे.
7 / 13
सुबोधचा धाकटा मुलगा मल्हारने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले आहे. त्याने बालकलाकार म्हणून फुगे चित्रपट आणि तुला पाहते रे मालिकेत काम केले आहे.
8 / 13
सुबोध भावेने थोरला मुलगा कान्हाच्या नावाने निर्मिती संस्था स्थापन केली आहे.
9 / 13
सुबोधचा मुलगा कान्हा त्याच्यासारखाच डॅशिंग आणि हॅण्डसम आहे.
10 / 13
सुबोधच्या चाहत्यांना कान्हादेखील अभिनय क्षेत्रात पदार्पण करेल का, हे जाणून घ्यायची उत्सुकता आहे.
11 / 13
सुबोध भावे फॅमिली मॅन असून तो बऱ्याचदा कुटुंबासोबत क्वॉलिटी टाइम स्पेंड करताना दिसतो.
12 / 13
सुबोध भावे लवकरच छोट्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे.
13 / 13
सुबोध भावे बस बाई बस या शोचं सूत्रसंचालन करताना दिसणार आहे.
टॅग्स :सुबोध भावे