By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2026 17:55 IST
1 / 8भारतीय सिनेसृष्टीतील असे अनेक अभिनेते आहेत ज्यांनी अपयश तर स्वीकारलं पण त्याचबरोबर न डगमगता मेहनतीने स्वतःचं इंडस्ट्रीत स्थान निर्माण केलं आणि आज यशाच्या शिखरावर पोहोचले आहे2 / 8चित्रपटाचा रुपेरी पडदा असो की ओटीटी चॅनल दिसणारा मोबाईलचा स्क्रीन यावर आपल्या प्रतिभाशाली अभिनयाने प्रेक्षकांच्या हृदयावर राज्य करणाऱ्या अभिनेत्यांपैकी आघाडीचा अभिनेता म्हणून ओळखले जाणारे अभिनेते चिरंजीवी.3 / 8 मेगास्टार चिरंजीवी यांचं खरं नाव कोनिडेला शिव शंकर वारा प्रसाद आहे. त्यांनी हिंदी, तेलुगू, तमिळ आणि कन्नड चित्रपटांमध्ये त्यांच्या अभिनय आणि दमदार नृत्याच्या माध्यमातून लोकांच्या हृदयात एक हक्काचं स्थान मिळवलं आहे. सध्या चिरंजीवी हे त्यांच्या 'मना संकरा वराप्रसाद गारू' या चित्रपटामुळे चर्चेत आहेत.4 / 85 / 8 चिरंजीवी यांनी १९७८ मध्ये 'पुनाधीरल्लू' या चित्रपटाद्वारे त्यांच्या चित्रपट कारकिर्दीची सुरुवात केली.मेगास्टार चिरंजीवीचं नाव घेतलं की इंडस्ट्रीत आदराने डोकं झुकतं. त्यांच्या ४५ वर्षांच्या चित्रपट कारकिर्दीत त्यांनी १५६ चित्रपटांमध्ये काम केलं आहे.6 / 8 १९९२ मध्ये एका मासिकाने चिरंजीवीबद्दल दावा केला होता की ते अमिताभ बच्चनपेक्षा महागडे स्टार आहेत आणि त्यांच्यापेक्षा जास्त कमावतात. २०१९ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'सये रा नरसिम्हा रेड्डी' या चित्रपटात चिरंजीवी आणि अमिताभ एकत्र दिसले होते. चिरंजीवी यांनी अनेक चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या असून त्यांनी ९०च्या दशकातील सर्वात महागड्या स्टार्सपैकी एक म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली.7 / 8'द वीक मॅगझिन'नुसार, जेव्हा अमिताभ एका चित्रपटात काम करण्यासाठी १ कोटी रुपये घेत होते.त्यावेळी चिरंजीवी यांनी अमिताभ बच्चन यांच्यापेक्षा जास्त फी घेतली होती. 8 / 8चिरंजीवी यांना आंध्र प्रदेशचा सर्वोच्च चित्रपट सन्मान रघुपती व्यंकय्या पुरस्कार, तीन नंदी पुरस्कार, नऊ फिल्मफेअर पुरस्कार दक्षिण आणि एक जीवनगौरव पुरस्कार मिळाला आहे. याव्यतिरिक्त, भारत सरकारने २००६ मध्ये त्यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. चिरंजीवी यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचं झालं तर १९८० मध्ये त्यांनी सुरेखा कोनिडेला यांच्यासोबत लग्न केले. या दांपत्याला राम चरण, सुष्मिता आणि श्रीजा ही मुले आहेत.