1 / 10अभिनेत्री श्रीलीला आणि क्रिकेटपटू तिलक वर्मा हे गेल्या काही काळापासून एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चांना सध्या उधाण आलं आहे. 2 / 10तिलक वर्मा देशांतर्गत क्रिकेटमध्ये हैदराबादचे प्रतिनिधित्व करतो आणि आयपीएलमध्ये 'मुंबई इंडियन्स'कडून खेळतो, तर श्रीलीला प्रामुख्याने तेलुगू चित्रपटसृष्टीत कार्यरत आहे. तिने 'भगवंत केसरी' आणि 'पुष्पा २' सारख्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. 3 / 10श्रीलीला आणि तिलक वर्मा यांच्या अफेअरच्या चर्चांनी दोन्ही क्षेत्रांतील चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढली होती. मात्र, आता या संपूर्ण प्रकरणावर श्रीलीलाची आई डॉ. स्वर्णलता यांनी थेट मौन सोडलं. डॉ. स्वर्णलता यांनी या सर्व अफवा पूर्णपणे खोट्या आणि निराधार असल्याचं 'डेक्कन क्रॉनिकल'शी बोलताना स्पष्ट केलं. 4 / 10डॉ. स्वर्णलता म्हणाल्या, 'या अफवांमध्ये किंचितही सत्य नाही. अशा खोट्या गोष्टी सोशल मीडियावर नेमक्या कशा पसरतात, हेच आम्हाला समजत नाही. श्रीलीला आणि तिलक वर्मा गेल्या वर्षभरापासून रिलेशनशिपमध्ये असल्याच्या बातम्या पूर्णपणे चुकीच्या आहेत'.5 / 10श्रीलीलाच्या भविष्यातील प्लॅन्सबद्दल सांगताना त्या म्हणाल्या, 'सध्या श्रीलीलाचे पूर्ण लक्ष तिच्या शिक्षणावर आणि अभिनय कारकिर्दीकडे आहे. ती आगामी जून महिन्यात होणाऱ्या NEET-PG परीक्षेची जोरदार तयारी करत आहे. सध्या तिचं संपूर्ण लक्ष अभ्यास आणि चित्रपटांवरच केंद्रित आहे. वैयक्तिक आयुष्यातील लग्न किंवा रिलेशनशिप या गोष्टींसाठी तिच्याकडे अजून पाच-सहा वर्षांचा मोठा वेळ आहे'.6 / 10तिलक वर्मा आणि श्रीलीला यांच्यात काहीतरी सुरू असल्याच्या चर्चांना दोन घटनांमुळे उधाण आलं होतं. पहिली घटना म्हणजे, डिसेंबर २०२५ मध्ये वैकुंठ एकादशीच्या निमित्ताने श्रीलीला तिच्या आईसोबत तिरुमला येथील श्री वेंकटेश्वर स्वामी मंदिरात गेली होती. योगायोगाने, त्याच वेळी तिलक वर्मा देखील आपल्या कुटुंबासह तिथे उपस्थित होता. सोशल मीडियाने या दोन्ही कुटुंबांच्या उपस्थितीचा संबंध थेट अफेअरशी जोडला.7 / 10दुसरी घटना म्हणजे, वानखेडे स्टेडियमवर झालेल्या एका टी-२० सामन्यादरम्यान श्रीलीला मॅच पाहण्यासाठी गेली होती. त्यावेळी टीममधील एका सदस्याने तिलक वर्माची जर्सी परिधान केल्याचे दिसले होते. मात्र, या दोन्ही घटना केवळ एक 'योगायोग' होत्या, असं डॉ. स्वर्णलता यांनी स्पष्ट केलं.8 / 10यापूर्वी श्रीलीलाचे नाव बॉलिवूडचा चॉकलेट बॉय कार्तिक आर्यनसोबतही जोडले गेले होते. दिग्दर्शक अनुराग बासू यांच्या आगामी रोमँटिक चित्रपटात हे दोघे एकत्र काम करत असल्यामुळे या चर्चा सुरू झाल्या होत्या.9 / 10या अफवांवरही डॉ. स्वर्णलता म्हणाल्या, 'कार्तिक आर्यनची आई आणि मी, आम्ही दोघीही व्यवसायाने गायनॅकॉलॉजिस्ट (Gynecologist) आहोत. वैद्यकीय क्षेत्रात एकत्र असल्यामुळे आमच्या अनेकदा भेटीगाठी होत असतात. पण दुर्दैवाने लोकांनी आमच्या व्यावसायिक ओळखीचा चुकीचा अर्थ काढून श्रीलीला आणि कार्तिकचे नाव एकमेकांशी जोडले'.10 / 10सध्या श्रीलीला कोणतेही नवीन प्रोजेक्ट्स साइन करण्यापूर्वी थोडा ब्रेक घेत असून, ती चांगल्या आणि दर्जेदार भूमिकांच्या प्रतीक्षेत आहे, अशी माहितीही तिच्या आईने दिली.