Join us
Daily Top 2Weekly Top 5

कोण आहे थलापती विजय यांची मुलगी? 'या' सिनेमात केलेलं काम; वडील मुख्यमंत्री झाले पण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2026 15:15 IST

1 / 7
साऊथ सुपरस्टार आणि तामिळनाडूचे नवे मुख्यमंत्री थलापती विजय आणि संगीता सोरनलिंगम यांची मुलगी म्हणजे दिव्या साशा.
2 / 7
दिव्याचा जन्म २००५ मध्ये झाला असून ती २१ वर्षांची आहे. तिला एक मोठा भाऊही आहे ज्याचं नाव जेसन संजय आहे. जेसन २६ वर्षांचा आहे.
3 / 7
अनेकांना माहीत नसेल, पण दिव्याने आपल्या वडिलांसोबत मोठ्या पडद्यावर स्क्रीन शेअर केली आहे. २०१६ मध्ये आलेल्या 'थेरी' या ब्लॉकबस्टर चित्रपटात दिव्याने विजय यांच्या मुलीची भूमिका साकारली होती. चित्रपटाच्या शेवटच्या दृश्यात ती वडिलांसोबत सायकल चालवताना दिसली होती.
4 / 7
विजय स्वतः प्रसिद्धीझोतात असले तरी, दिव्या साशा मात्र ग्लॅमर वर्ल्ड आणि सोशल मीडियापासून बरीच दूर असते. ती सार्वजनिक ठिकाणी किंवा फिल्मी पार्ट्यांमध्ये फारशी दिसत नाही. तिचे मोजकेच फोटो सोशल मीडियावर उपलब्ध आहेत.
5 / 7
दिव्याला अभिनयापेक्षा खेळाची जास्त आवड आहे. ती एक उत्तम बॅडमिंटन पटू आहे. शालेय स्तरावर तिने बॅडमिंटनमध्ये अनेक स्पर्धा गाजवल्या असून चेन्नईतील एका नामांकित शाळेच्या बॅडमिंटन टीमची ती महत्त्वाची खेळाडू होती.
6 / 7
सध्या दिव्या साशा काय करते? असा प्रश्न चाहत्यांना पडतो. दिव्या सध्या तिचे उच्च शिक्षण पूर्ण करण्यासाठी कॅनडा मध्ये आहे. तिने तिथल्या एका प्रतिष्ठित युनिव्हर्सिटीत प्रवेश घेतला असून ती सध्या तिच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करत आहे.
7 / 7
१० मे २०२६ रोजी झालेल्या विजय यांच्या शपथविधीनंतर त्यांच्या कुटुंबियांनी काहीही प्रतिक्रिया दिली नाही. वडील मुख्यमंत्री झाले पण दिव्या आणि तिच्या भावानेही काहीच रिअॅक्ट केलं नाही याचीखूप चर्चा झाली. दिव्याचा भाऊ जेसनने तर नावातून वडिलांचं नावंही हटवलं आहे.
टॅग्स :थलपती विजयTollywood