Join us
Daily Top 2Weekly Top 5

सेटवर पहिली भेट ते आयुष्यभराचे सोबती! अशी फुलली समांथा-राज यांची लव्हस्टोरी, इंटरेस्टिंग आहे किस्सा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2025 18:39 IST

1 / 7
2 / 7
अभिनेता नागा चैतन्य सोबत घटस्फोट झाल्यानंतर तब्बल ४ वर्षाने समंथा विवाहबद्ध झाली आहे. सध्या सोशल मीडियावर सगळीकडे तिच्याच लग्नाची चर्चा सुरु आहे.
3 / 7
समांथा आणि राज यांच्या डेटिंगच्या चर्चा गेल्या काही काळापासून चित्रपटसृष्टीत सुरू होत्या. हे दोघेही अनेक वेळा एकत्र दिसले. अखेर या चर्चांना पूर्णविराम देत समांथा आणि राज यांनी नव्या प्रवासाला सुरुवात केली.
4 / 7
सध्या या कपलवर सगळीकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. परंतु तुम्हाला माहितीये का समांथा आणि राज नदिमरू यांची लव्हस्टोरी फारच फिल्मी आहे.
5 / 7
समांथा ही दाक्षिणात्य सिनेविश्वातील नावाजलेली अभिनेत्री आहे, तर राज प्रसिद्ध चित्रपट निर्मात्यांपैकी एक आहेत.मीडिया रिपोर्ट्सनुसार, दोघांची पहिली भेट २०२१ मध्ये आलेल्या 'फॅमिली मॅन २' या वेब सीरिजच्या निर्मिती दरम्यान झाली होती.
6 / 7
याचवर्षी समांथाने नागा चैतन्यला घटस्फोट दिला होता.पिकलबॉल टीम चेन्नई सुपर चॅम्प्सच्या सामन्यादरम्यान हे दोघे पहिल्यांदा एकत्र दिसले होते आणि त्यानंतर लगेचच त्यांच्या नात्याबद्दलच्या बातम्या समोर आल्या. शिवाय यंदाची दिवाळीही कपलने एकत्र साजरी केली होती.
7 / 7
निर्माते राज निदिमोरू हे 'शोर इन द सिटी', 'सिनेमा बंदी' आणि 'अनपॉज्ड' सारख्या चित्रपटांसाठी तसेच 'द फॅमिली मॅन', 'सिटाडेल: हनी बनी' आणि 'फर्गी' सारख्या लोकप्रिय मालिकांसाठी ओळखले जातात.
टॅग्स :समांथा रुथ प्रभूTollywoodसेलिब्रिटी