Join us
Daily Top 2Weekly Top 5

Photos: लेकीला पहिली पाळी आली; साऊथ अभिनेत्रीने केला मोठा सोहळा, सोशल मीडियावर होतंय कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2026 13:13 IST

1 / 10
साऊथचे कलाकार त्यांची परंपरा, संस्कृती यांचं नेहमीच आदराने पालन करत ते जपण्याचा प्रयत्न करताना दिसतात.
2 / 10
मुलगी मोठी झाली म्हणजेच तिला पहिली पाळी आल्यानंतर त्याचा सोहळा करण्याची साऊथमध्ये परंपरा आहे.
3 / 10
प्रसिद्ध अभिनेत्री लक्ष्मी मंचूने देखील लेक विद्या निर्वाणा मंचू हिच्या पहिल्या पाळीचा सोहळा मोठ्या दिमाखात साजरा केला.
4 / 10
या सोहळ्याला 'हाफ सारी' असं म्हटलं जातं. ११-१४ वर्षांच्या वयोगटातील रजस्वला होणाऱ्या म्हणजेच बालपणातून तारुण्याच्या प्रवासाला सुरुवात करणाऱ्या मुलींसाठी हा सोहळा केला जातो.
5 / 10
या सोहळ्याला आशीर्वाद सोहळा असंही म्हटलं जातं. याला तेलगूमध्ये 'रितु कला संस्कार' किंवा 'पेद्दामनिषी पांडगा' असेही म्हणतात.
6 / 10
लक्ष्मी मंचू हिनेदेखील लेक विद्यासाठी हाफ सारी सोहळ्याचं आयोजन केलं होतं. याचे फोटो तिने शेअर केले आहेत.
7 / 10
यावेळी लेकीची पालखीतून मोठ्या थाटामाटात एन्ट्री करण्यात आली. विद्याला छान नटवलंही होतं.
8 / 10
या सोहळ्यासाठी केळीच्या पानांनी आणि फुलांनी खास आकर्षक अशी सजावटही करण्यात आली होती.
9 / 10
पारंपरिक पद्धतीने शास्त्र शुद्ध पद्धतीने पूजा विधी करत विद्या निर्वाणाचा 'हाफ सारी' सोहळा पार पडला.
10 / 10
या सोहळ्याला कुटुंबीय आणि मित्रपरिवाराने हजेरी लावली होती.
टॅग्स :सेलिब्रिटी