Join us
Daily Top 2Weekly Top 5

लाल साडी, केसात गजरा; समांथा रुथ प्रभूचा लग्नातील स्वप्नवत लूक, नवीन फोटो आले समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2025 13:38 IST

1 / 11
लोकप्रिय अभिनेत्री समांथा रुथ प्रभू हिने १ डिसेंबर २०२५ रोजी राज निदिमोरूसोबत संसार थाटला आहे. अभिनेता नागा चैत्यनपासून घटस्फोट घेतल्यानंतर चार वर्षांनी समांथाने दुसरं लग्न केलं आहे.
2 / 11
समांथा व राज निदिमोरूचं लग्न ईशा योग केंद्रातील लिंग भैरवी मंदिरात पार पडलं. हा समारंभ अत्यंत साधेपणाने पार पडला आणि लग्नात फक्त ३० पाहुणे उपस्थित होते.
3 / 11
समांथाच्या लग्नातील काही खास फोटो आज समोर आले आहेत. ज्यामध्ये वधूच्या रुपात समांथा प्रचंड सुंदर दिसतेय.
4 / 11
समांथा रुथ प्रभूने तिच्या लग्नासाठी लाल रंगाची साडी परिधान केली होती. समांथाने निवडलेली ही साडी तिच्या सौंदर्याला चार चाँद लावणारी ठरली.
5 / 11
साध्या पण आकर्षक मेकअप आणि जुळणाऱ्या दागिन्यांमध्ये समांथा अगदी एखाद्या अप्सरेसारखी दिसली.
6 / 11
या फोटोंमधून समांथाच्या चेहऱ्यावरील लग्नाचा आनंद स्पष्टपणे दिसत आहे. तिचा हा पारंपरिक लूक सध्या फॅशन स्टेटमेंट बनला आहे.
7 / 11
समांथाचा ब्रायडल लूक जितका चर्चेत आहे, त्याहून अधिक लक्ष वेधून घेतले आहे, तिच्या वेडिंग रिंगने. समांथाच्या या अंगठीची किंमत सुमारे १.५ कोटी रुपये इतकी असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
8 / 11
लाल साडीसोबत तिने तिच्या केसांमध्ये गजरा माळला होता, ज्यामुळे तिच्या पारंपरिक लूकला एक खास टच मिळाला आहे.
9 / 11
समांथानं हातावर आणि पायावर काढलेली सुंदर मेंदी तिच्या वधूच्या सौंदर्यात आणखी भर घालत होती.
10 / 11
समांथा आणि राज या दोघांमध्ये १२ वर्षांचं अंतर आहे. राजचा जन्म ४ ऑगस्ट १९७५ रोजी तिरुपति आंध्र प्रदेशमध्ये झाला. तो ५० वर्षांचा आहे. तर समंथा ३८ वर्षांची आहे.
11 / 11
समांथा आणि राज यांच्या लग्न समारंभाचे eshantrajuphotography या इंस्टाग्राम पेजवरून घेतले आहेत.
टॅग्स :समांथा रुथ प्रभू