By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2026 17:56 IST
1 / 7साऊथ सिनेसृष्टीतील ब्युटिफूल कपल रश्मिका मंदाना आणि विजय देवराकोंडा २६ फेब्रुवारीला लग्नाच्या बेडीत अडकले. त्यांच्या लग्नाचे फोटो व्हायरल झाले होते.2 / 7आता त्यांच्या मेहेंदी सोहळ्याचे फोटो समोर आले आहेत. रश्मिका-विजयने मेहेंदी सोहळ्यातील खास क्षण शेअर केले आहेत. 3 / 7या मेहेंदी सोहळ्यालाही रश्मिका-विजयने पारंपरिक लूक केल्याचं दिसलं. रश्मिकाने लेहेंगा घातला होता. 4 / 7तर विजयने साऊथची परंपरा जपत लुंगी आणि जॅकेट असा लूक केला होता. 5 / 7या सगळ्या फोटोंमध्ये लक्ष वेधून घेतलं ते रश्मिकाच्या मेहेंदीने. लग्नाच्या मेहेंदीतही तिने संस्कृती जपली. 6 / 7रश्मिकाने हातभर मेहेंदी न काढता एका हातावर ओम तर दुसऱ्या हातावर देवी अशी मेहेंदी काढली होती. 7 / 7अभिनेत्रीच्या साधेपणाचं आणि तिने जपलेल्या संस्कृतीचं सर्वत्र कौतुक होत आहे.