Join us
Daily Top 2Weekly Top 5

रश्मिका-विजयच्या लग्नासाठी बुक झालं उदयपूरचं महागडं हॉटेल; एका रात्रीचं भाडं ऐकून थक्क व्हाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2026 17:43 IST

1 / 10
दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील सर्वात लाडकी जोडी रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा अखेर विवाहबंधनात अडकणार आहेत.
2 / 10
गेल्या अनेक वर्षांपासून त्यांच्या डेटिंगच्या चर्चा रंगत होत्या. मात्र रविवारी (२२ फेब्रुवारी) रात्री 'द वेडिंग ऑफ विरोश' नावाने पोस्ट शेअर करत आपल्या नात्याची अधिकृत कबुली दिली.
3 / 10
रश्मिका आणि विजयनं आपल्या शाही विवाहासाठी राजस्थानमधील उदयपूर येथील एका अत्यंत आलिशान हॉटेलची निवड करण्यात आली आहे.
4 / 10
रश्मिका आणि विजयने त्यांच्या लग्नासाठी उदयपूरपासून सुमारे ३० किलोमीटर दूर असलेल्या अरवली पर्वतरांगांमध्ये स्थित 'आयटीसी मेमेंटोस' (Mementos by ITC Hotels Ekaaya) या लक्झरी रिसॉर्टची निवड केली आहे.
5 / 10
हे हॉटेल शहराच्या गोंगाटापासून दूर, निसर्गरम्य आणि अत्यंत खासगी वातावरणात आहे. या आलिशान हॉटेलचे दर ऐकून सामान्य माणसाचे डोळे विस्फारतील.
6 / 10
हॉटेलच्या अधिकृत वेबसाइट आणि रिपोर्ट्सनुसार, येथे विविध श्रेणीतील खोल्या उपलब्ध आहेत.
7 / 10
या आलिशान हॉटेलमधील व्हॅली व्ह्यू व्हिलासाठी एका रात्रीचे भाडे सुमारे २८,००० ते ३५,००० रुपये आहे. तर अरावली सूट्ससाठी ५७,००० ते ७१,००० रुपये मोजावे लागतात. इतकेच नाही तर, अधिक सुखसोयी असलेल्या मेमेंटोस सूट्सचे भाडे एका रात्रीसाठी तब्बल ७३,००० ते ९१,००० रुपयांच्या घरात आहे. प्रेसिडेन्शियल आणि ग्रँड सूट्स या रूम्सचे भाडे दीड लाख रुपयांच्या पुढे जाऊ शकते.
8 / 10
मिळालेल्या माहितीनुसार, लग्नाआधीचे विधी २४ फेब्रुवारीपासून सुरू होणार असून, पहिल्या दिवशी संगीत आणि मेहंदीचा कार्यक्रम पार पडेल. तर २६ फेब्रुवारी २०२६ रोजी हे जोडपे राजस्थानच्या या शाही थाटात लग्नगाठ बांधेल.
9 / 10
उदयपूरमधील या मुख्य सोहळ्यासाठी तेलगू किंवा हिंदी चित्रपटसृष्टीतील कोणत्याही बड्या सेलिब्रिटीला निमंत्रण देण्यात आलेले नाही. मात्र लग्नानंतर हैदराबाद आणि मुंबईमध्ये दोन भव्य रिसेप्शन पार्ट्यांचे आयोजन केले जाण्याची शक्यता आहे.
10 / 10
याशिवाय विजय-रश्मिकाच्या लग्नाला येणाऱ्या पाहुण्यांसाठी जेवणाचा विशेष मेन्यू डिझाइन करण्यात आला आहे. याठिकाणी फिटनेस सेंटर, रॉयल स्पा सुद्धा आहे. पर्यटक या आलिशान हॉटेलमध्ये इन्फिनिटी पूलचा सुद्धा आनंद घेऊ शकतात.
टॅग्स :रश्मिका मंदानाविजय देवरकोंडा