Join us
Daily Top 2Weekly Top 5

रश्मिकाची आई सुमन यांच्या 'कुर्गी स्टाईल साडी'ची चर्चा; का नेसली 'उलटी' साडी? इतिहास जाणून घ्या!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2026 17:46 IST

1 / 10
विजय देवरकोंडा व रश्मिका मंदाना २६ फेब्रुवारी रोजी उदयपूरमध्ये विवाहबंधनात अडकले. त्यानंतर त्यांचा रिसेप्शन सोहळा ४ मार्च रोजी हैदराबादमध्ये पार पडला. या शाही रिसेप्शन सोहळ्याचे प्रचंड फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झालेत.
2 / 10
रश्मिका मंदाना हिनं आपल्या रिसेप्शनमध्ये खास मैसूर सिल्क प्रकारातल्या साडीची निवड केली होती. प्लेन मैसूर सिल्क साडी, काळे काठ आणि काठांवर सोन्याची लखलखती जरी असा काही तिचा थाट होता. पण, रश्मिकापेक्षा सध्या सोशल मीडियावर तिची आई सुमन मंदाना यांनी नेसलेल्या साडीची चर्चा जास्त रंगली आहे.
3 / 10
रश्मिका आणि विजयच्या रिसेप्शनमध्ये तिची आई सुमन मंदाना नेसलेल्या आगळ्यावेगळ्या पारंपारिक कुर्गी साडीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. झगमगत्या फॅशनच्या जगातही रश्मिकाच्या आईने पारंपरिक पोशाखाला महत्त्व दिलं.
4 / 10
सुमन मंदाना यांनी फिकट जांभळ्या रंगाची नेसलेली साडी ही कुर्गी किंवा कोडावा पद्धतीची होती. कर्नाटकात कोणत्याही पारंपरिक कार्यक्रमांमध्ये, लग्नसोहळे किंवा मग सणावाराला अशा पद्धतीनेच कुर्गी साडी नेसण्यात येते.
5 / 10
ज्याप्रमाणे गुजराथी किंवा बंगाली पद्धतीने साडी नेसली जाते किंवा महाराष्ट्रीयन पद्धतीने नऊवारी घालतात, तशीच कुर्गी पद्धतीने नेसलेली साडी ही खास 'कर्नाटकी स्टाईल' म्हणून ओळखली जाते.
6 / 10
या साडीचं वैशिष्ट्य म्हणजे घड्यांचा भाग मागे अडकवला जातो आणि पदर उजवीकडून डावीकडे छातीवरून खांद्यावर नेऊन पिन केला जातो. पुढे साडी सुटू नये म्हणून पारंपरिक 'मोलकत्तू' पिन वापरली जाते.
7 / 10
रश्मिकाच्या आईनं कुर्गी पद्धतीने नेसलेल्या साडीवर पारंपारिक दागिने परिधान केले. एक माळ आणि सुंदरसा नाजूक नेकलेस त्यांनी घातला. तसेच त्यांनी आपले केस बांधले होते.
8 / 10
रश्मिकादेखील अनेकदा कुर्ग शैलीची साडीत पाहायला मिळाली आहे. रश्मिका मंदाना ही मूळची कर्नाटकच्या कोडागू (कूर्ग) भागातील असून ती एका कोडावा हिंदू कुटुंबातील आहे. कोडावा समाज त्यांच्या अद्वितीय परंपरा आणि शौर्यासाठी ओळखला जातो.
9 / 10
कुर्गी साडीची परंपरा शेकडो वर्षांपासून चालत आली आहे. कोडवा समाजात महिलांनी काम करताना आणि युद्धकाळातही सहज हालचाल करता यावी म्हणून ही वेगळी नेसण्याची पद्धत विकसित झाली.
10 / 10
कोडवा समाज ऐतिहासिकदृष्ट्या योद्धा संस्कृतीसाठी ओळखला जातो. पुरुष जसे शस्त्रांसह सज्ज असायचे तसेच महिलाही दैनंदिन कामे, शेती आणि जंगलातील कामे सहज करू शकतील अशा प्रकारे साडी नेसायच्या.
टॅग्स :रश्मिका मंदानाविजय देवरकोंडाकर्नाटक