ऋषभ शेट्टीपेक्षा रुक्मिणीची चर्चा! 'कांतारा: चॅप्टर १' फेम अभिनेत्री आहे तरी कोण? उरीच्या युद्धात शहीद झालेले वडील
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2025 16:37 IST
1 / 8सध्या सर्वत्र 'कांतारा: चॅप्टर १' या सिनेमाची चर्चा सुरू आहे. २०२२ साली आलेल्या 'कांतारा' सिनेमाचा हा प्रीक्वेल आहे. ऋषभ शेट्टीच्या या सिनेमाची चाहते वाट पाहत होते. 2 / 8पण, सिनेमा रिलीज झाल्यानंतर ऋषभ शेट्टीपेक्षा अभिनेत्री रुक्मिणी वसंत हिचीच सगळीकडे चर्चा होत आहे. 3 / 8'कांतारा: चॅप्टर १'मध्ये रुक्मिणीने कनाकवथी ही भूमिका साकारून प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली आहेत. 4 / 8पण, 'कांतारा: चॅप्टर १'मुळे प्रसिद्धीझोतात आलेली रुक्मिणी नक्की कोण आहे? जाणून घेऊया. 5 / 8रुक्मिणी वसंत ही एक कन्नड अभिनेत्री आहे. तिने तामिळ, तेलुगु या भाषांच्या सिनेमांतही काम केलं आहे. 6 / 8रुक्मिणीचा जन्म बंगळूरमधील कन्नड परिवारात झाला. २०१९ मध्ये कन्नड सिनेमातून रुक्मिणीने पदार्पण केलं होतं. 7 / 8अभिनेत्रीचे वडील वसंत वेणुगोपाल हे भारतीय लष्करात कर्नल होते. २००७मध्ये जम्मू-काश्मीरमध्ये झालेल्या उरी हल्ल्यात ते शहीद झाले. 8 / 8रुक्मिणी 'कांतारा: चॅप्टर १' सिन्मामुळे चर्चेत आली असून तिच्या भूमिकेने तिला प्रसिद्धी मिळवून दिली आहे.