1 / 7डार्लिंग या नावाने चाहत्यांमध्ये प्रचलित असलेला बाहुबली फेम अभिनेता प्रभास लग्न करणार आहे, अशी चर्चा सर्वत्र रंगली आहे. त्याच्या एका पोस्टनंतर या चर्चेला उधाण आले. आता प्रकरणावर अभिनेत्याने मौन सोडले आहे. 'कल्कि 2898 AD'सिनेमाच्या इव्हेंटवेळी त्याने सत्य सांगितले.2 / 7प्रभास लग्न कधी करणार, हे जाणून घेण्यासाठी चाहते नेहमीच उत्सुक असतात. बऱ्याचदा प्रभासच्या अफेयरर्सच्या चर्चा ऐकायला मिळतात. अलिकडेच त्याने एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यात त्याने एका खास व्यक्तीचा उल्लेख केला आहे, ज्यामुळे पुन्हा एकदा त्याच्या लग्नाच्या चर्चेला उधाण आले आहे. दरम्यान आता लग्नाच्या चर्चेवर अभिनेत्याने मौन सोडले आहे. 3 / 7प्रभास लवकरच 'कल्कि 2898 AD'या सिनेमात दिसणार आहे. या सिनेमाच्या इव्हेंटमध्ये त्याने लग्नाच्या चर्चेवर मौन सोडले. 4 / 7प्रभासने खुलासा केला की, तो लवकरच लग्नबेडीत अडकणार नाहीये. त्याने स्पष्ट शब्दात सांगितले की, मी लवकर लग्न करणार नाही आहे कारण मला माझ्या फिमेल चाहत्यांच्या भावना दुखवायच्या नाहीत.5 / 7अभिनेत्याच्या बोलण्यावरून स्पष्ट होतंय की, तो इतक्यात लग्न करण्याच्या मूडमध्ये नाही आणि सध्या तो कामावर लक्ष केंद्रीत करतो आहे.6 / 7प्रभासचे नाव कधी अनुष्का शेट्टी तर कधी क्रिती सनॉनसोबत जोडलं गेलंय. त्याने कधीच त्याच्या लव्ह लाइफबद्दल सांगितले नाही. तो त्यांना चांगले मित्र मानतो.7 / 7प्रभास लवकरच 'कल्कि 2898 AD'सिनेमात अमिताभ बच्चन आणि दीपिका पादुकोणसोबत दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन नाग अश्विन करत आहे. हा चित्रपट हिंदू माइथोलॉजीवर आधारीत आहे. बिग बजेटमध्ये बनलेला हा चित्रपट २७ जूनला रिलीज होणार आहे.