Join us
Daily Top 2Weekly Top 5

नागा चैतन्यशी लग्नानंतर काय बदललं? दुसरी पत्नी शोभिता म्हणते- "तेव्हापासून मी एकदाही..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2026 10:35 IST

1 / 7
दाक्षिणात्य अभिनेत्री शोभिता धुलिपाला सध्या तिच्या 'चीकाटिलो' (Cheekatilo) या सस्पेन्स-थ्रिलर चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. यादरम्यान एका मुलाखतीत तिने लग्नानंतर आयुष्यात काय बदल झाला याचा खुलासा केलाय.
2 / 7
नागा चैतन्यसोबत लग्न झाल्यापासून शोभिताने अद्याप एकदाही किचनमध्ये पाऊल ठेवलेले नाही किंवा स्वतः स्वयंपाक केलेला नाही.
3 / 7
शोभिता म्हणाली, 'मी दररोज जेवण बाहेरून ऑर्डर करते. मला वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ चाखायला आणि नवीन रेस्टॉरंट्समध्ये जायला खूप आवडते.'
4 / 7
जेवण ऑर्डर करण्यापूर्वी शोभिता अनेकदा आपल्या मित्र-मैत्रिणींकडून आणि नातेवाईकांकडून कोणत्या रेस्टॉरंटचे जेवण चांगले आहे, याचे सल्ले घेते आणि तसं जेवण ऑर्डर करते.
5 / 7
नागा चैतन्य स्वतः एका मोठ्या फूड बिझनेसचा मालक आहे. शोभिताने दिलेली ही प्रांजळ कबुली सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.
6 / 7
शोभितासाठी अन्न केवळ भूक भागवण्याचे साधन नसून, तो एक प्रकारचा 'फूड ॲडव्हेंचर' आहे.
7 / 7
लग्नानंतर महिलांनी किचन सांभाळलेच पाहिजे, या पारंपरिक विचारांना छेद देणारी शोभिताचा हा आधुनिक विचार अनेकांना भावणारा आहे. शोभिता सध्या हिंदी आणि साऊथ सिनेमांत काम करुन प्रेक्षकांचं मन जिंकतेय.