साऊथ नाही 'भारतीय' म्हणा, अभिनेत्री संतापून म्हणाली, "त्वचा गोरी नाही म्हणून काय झालं?"
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2024 12:20 IST
1 / 8मनोरंजनसृष्टी म्हटलं की लोकांना डोळ्यासमोर केवळ बॉलिवूडच दिसतं. पण भारतीय मनोरंजनसृष्टीत बॉलिवूडशिवाय इतरही भाषेतील सिनेसंस्कृती आहे. केवळ हिंदी नाही तर तमिळ, तेलुगू, कन्नड, भोजपुरी, मल्याळम ही इंडस्ट्री देखील आहे. नुकतंच दाक्षिणात्य अभिनेत्रीचं लेबल लावणाऱ्यांना अभिनेत्री प्रियामणिने (Priyamani) उत्तर दिलं आहे. 2 / 8'जवान', 'आर्टिकल 370' मध्ये झळकलेल्या अभिनेत्री प्रियमणिने नुकतीच पिंकव्हिलाला मुलाखत दिली. दाक्षिणात्य अभिनेत्री असं लेबल लावणाऱ्यांना तिने उत्तर दिलं.3 / 8ती म्हणाली, 'मी हिंदी फिल्म इंडस्ट्रीत आले तेव्हा मला साऊथ अभिनेत्री म्हणलं जायचं. निर्माते त्यांच्या सिनेमातील साऊथ इंडियन कॅरेक्टरसाठी माझ्याशी संपर्क करायचे. ही साऊथ भूमिका आहे म्हणून आम्हाला तुला कास्ट करायचं आहे असं ते मला म्हणायचे.'4 / 8'पण हे लवकरच बदलेल अशी मला आशा आहे. आम्ही दक्षिण भारतातून असलो तरी मला वाटतं आम्ही ही भाषा व्यवस्थित बोलू शकतो. आम्ही सुद्धा इतरांसारखेच चांगले दिसतो.' असंही ती म्हणाली.5 / 8ती पुढे म्हणाली, 'आमची त्वचा इथल्या अभिनेत्रींसारखी गोरी आणि चमकदार नाही पण यामुळे काहीच फरक नाही पडला पाहिजे. मी म्हणते दक्षिणेचे स्त्री असो किंवा पुरुष सगळ्यांनाच हिंदी भाषा माहित आहे आणि ते योग्यरित्या बोलतातही.'6 / 8'हा, व्याकरण थोडं इकडे तिकडे होत असेल पण जोवर भावना चित्रित करण्याचा मुद्दा आहे तोवर मला नाही वाटत याचा फरक पडला पाहिजे. उत्तर आणि दक्षिण हा दृष्टिकोनच बदलला पाहिजे आणि आपण नेहमी भारतीय स्टार्स आहोत आणि असंच असलो पाहिजे.'7 / 8प्रियामणिने सर्वात आधी 'चेन्नई एक्सप्रेस' सिनेमात एक आयटम साँग करत बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. तिने केवळ शाहरुखसोबत स्क्रीन शेअर करता यावी यासाठी हे गाणं स्वीकारलं होतं. 8 / 8नंतर तिला शाहरुखसोबत 'जवान' सिनेमात काम करण्याची संधी मिळाली. नुकतीच ती यामी गौतमच्या 'आर्टिकल 370' मध्येही झळकली.