Join us
Daily Top 2Weekly Top 5

सोनम कपूरला पती आनंद आहुजाने लग्नाच्या वाढदिवसाला दिले हे स्पेशल गिफ्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2020 15:25 IST

1 / 8
सोनम कपूर आणि आनंद आहुजाचा लग्नाचा वाढदिवस असून आनंदने सोनमला एक खूप छान गिफ्ट दिले आहे. सोनमने या गिफ्टचा व्हिडिओ इन्स्टाग्राम स्टोरीवर पोस्ट केला आहे.
2 / 8
सोनमने इन्स्टाग्रामवर लग्नातला एक फोटो पोस्ट केला आहे. यात सोनमचे आणि आनंदचे आईवडील दिसत आहेत.
3 / 8
सोनम आणि आनंदच्या लग्नाला आज दोन वर्षं झाले आहेत.
4 / 8
सोनम आणि आनंदच्या लग्नाची चांगलीच चर्चा त्यावेळी मीडियात रंगली होती. लग्नात सोनम खूपच छान दिसत होती. तिचे लग्नातले अनेक फोटो आपल्याला तिच्या सोशल मीडियावर पाहायला मिळतात.
5 / 8
२०१४ मध्ये सोनम आणि आनंदची पहिली नजरानजर झाली होती. दोघांचीही कॉमन फ्रेन्ड परनिया कुरैशी हिला याचे श्रेय जाते. परनिया दोघांचीही चांगली मैत्रीण आहे. परनियाच्या माध्यमातून सोनम व आनंद पहिल्यांदा भेटले.
6 / 8
आश्चर्य वाटेल पण या पहिल्या भेटीच्या महिनाभरानंतरच आनंदने सोनमला प्रपोज केले आणि इथून या गोड प्रेमकथेची सुरुवात झाली. मे २०१८ मध्ये दोघांनीही लग्न केले.
7 / 8
आनंद व सोनमने एकमेकांना डेट करणे सुरु केले,त्या दिवसापासून बरोबर दोन महिन्यांनी सोनमचा वाढदिवस होता. सोनमच्या वाढदिवसासाठी आनंदने एक सरप्राईज प्लान केले. त्याने एक रेस्टॉरंट बुक केले आणि सोनमच्या आवडीचा मेन्यू, म्युझिक अशी सगळी जंगी तयारी केली होती.
8 / 8
सोनम रेस्टॉरंटमध्ये पोहोचताच आनंदने तिला त्याने हाताने लिहिलेले एक कार्ड गिफ्ट केले. सोनमसाठी खूप खास होते. कारण यापूर्वी कुणीही कधीही तिच्यासाठी असे काही केले नव्हते.
टॅग्स :सोनम कपूर