Join us

साई मारा आणि सेरेन्गेटीच्या रोमांचक सफारीवर सोनाली कुलकर्णी! शेअर केले नवऱ्यासोबतचे खास फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2025 15:21 IST

1 / 10
मराठमोळी अप्सरा सोनाली कुलकर्णी सध्या तिच्या कामातून ब्रेक घेऊन पती कुणाल बेनोडेकरसोबत आफ्रिकेतील जंगलात सफारीचा आनंद लुटत आहे.
2 / 10
तिने या खास ट्रीपमधील सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. त्यात ती प्रचंड उत्साही आणि आनंदी दिसत आहे.
3 / 10
सोनाली कुलकर्णीनं केनियातील मसाई मारा (Maasai Mara, Kenya) आणि टांझानियातील सेरेन्गेटी (Serengeti, Tanzania) या जगप्रसिद्ध नॅशनल पार्क्सची सफर केली आहे.
4 / 10
नैसर्गिक सौंदर्यासाठी ही ठिकाणे खूप प्रसिद्ध आहेत. असे म्हटले जाते की जर तुम्हाला खऱ्या घनदाट जंगलाचा आणि थरारक वन्यजीवनाचा अनुभव घ्यायचा असेल, तर एकदा मसाई मारा आणि सेरेन्गेटीची सफारी अवश्य करावी.
5 / 10
तिने शेअर केलेल्या फोटोंमध्ये ती आणि कुणाल जीपमधून जंगल सफारीचा आनंद घेताना दिसत आहेत.
6 / 10
या दोन्ही ठिकाणी सिंह, हत्ती, चित्ते, झेब्रा आणि इतर अनेक वन्य प्राणी मुक्तपणे फिरताना पाहायला मिळतात. या सफारीदरम्यान त्यांनी अनेक जंगली प्राणी जवळून पाहिले.
7 / 10
सोनालीला विविध ठिकाणी फिरण्याची आवड आहे, विशेषकरुन ती भारताबाहेरील अनेक देशात भटकंती करत असते. आपल्या व्यस्त कामातून वेळ काढत ती सतत नवनवीन ठिकाणांचा शोध घेत असते.
8 / 10
सोनाली कुलकर्णीने अनेक देशांमध्ये प्रवास केला आहे, जसे की जपान, इंग्लड, इंडोनेशिया, अमेरिका आणि दुबईसारख्या देशांमध्येही फिरली आहे.
9 / 10
सोनाली कुलकर्णीने नेहमीच चाहत्यांना तिच्या वैयक्तिक आयुष्यातील अपडेट्स देत असते.
10 / 10
तिच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर सोनाली बऱ्याच मोठ्या काळापासून कोणत्या सिनेमात झळकलेली नाही. तिचे चाहते तिच्या आगामी प्रोजेक्टची वाट पाहत आहेत.
टॅग्स :सोनाली कुलकर्णीसेलिब्रिटीमराठी अभिनेता