1 / 9आमिर खानने बॉलिवूडमध्ये प्रवेश करण्याआधी रिना दत्ताशी लग्न केले होते. पण काहीच वर्षांच्या संसारानंतर त्यांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला.2 / 9त्यानंतर आमिर खानने किरण रावशी लग्न केले.3 / 9आमिर आणि किरण रावच्या लग्नाला १५ वर्षं झाली असून बॉलिवूडमधील क्यूट कपलमध्ये त्यांची गणना केली जात होती. 4 / 9मात्र आता आमिर खान आणि किरण रावने विभक्त होण्याचा निर्णय घेतला. 5 / 9आमिरसोबत राहाणे कठीण असल्याचे किरणने काही दिवसांपूर्वी कॉफी विथ किरण या कार्यक्रमात सांगितले होते.6 / 9 पण तिने असे का सांगितले, त्यामागे एक खास कारण आहे. 7 / 9किरण रावने करणला कॉफी विथ करण या कार्यक्रमात सांगितले होते की, आमिर आणि माझी ओळख झाली, त्यावेळी त्याचे रिनासोबतचे वाद सुरू होते. तसेच आमिरचा स्वभाव हा खूप वेगळा असल्याचे त्याच्यासोबत फिट होणे मला कठीण वाटत होते.8 / 9आमिर खानला पार्ट्या करायला अजिबातच आवडत नाहीत. त्याला गाणी मोठ्या आवाजात ऐकलेली आवडत नाहीत. या सगळ्यामुळे तो एकदम शांत असेल असे अनेकांना वाटते. पण असे काहीही नाहीये.9 / 9लगान चित्रपटादरम्यान आमिर आणि किरण रावची ओळख झाली. त्यावेळी ती फक्त मैत्रीण होती. आमिरच्या घटस्फोटानंतर त्यांच्यात जवळीक वाढली आणि २००५ मध्ये आमिर खान आणि किरण रावने लग्न केलं. त्यांना एक मुलगाही आहे. त्याचे नाव आझाद आहे