Join us
Daily Top 2Weekly Top 5

पती आणि दोन मुलांसह १०० कोटींच्या घरात राहते शिल्पा शेट्टी, पाहा अभिनेत्रीच्या घरातील Inside Photo

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2023 12:27 IST

1 / 9
Shilpa Shetty Home: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी गेल्या तीन दशकांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. अभिनेत्रीने बिझनेसमन राज कुंद्रासोबत लग्न केले आहे. शिल्पा नेहमी सोशल मीडियावर जे फोटो शेअर करत असते त्यात तिच्या अलिशान घराची झलक नेहमीच पाहायला मिळते.
2 / 9
शिल्पा शेट्टी आपल्या पती आणि कुटुंबासोबत मुंबईत सी फेसिंग आलिशान बंगल्यात राहते.
3 / 9
शिल्पाच्या या बंगल्याचे नाव 'किनारा' आहे. जे खूप मोठे आणि सर्व प्रकारच्या सुविधांनी सुसज्ज आहे. या घराची किंमत सुमारे 100 कोटी आहे.
4 / 9
याशिवाय शिल्पाच्या घराचा लॉबी एरिया खूपच आकर्षक आहे. या ठिकाणी आलिशान एन्टिक शो पीस ठेवण्यात आले आहेत.
5 / 9
शिल्पा शेट्टीचा डायनिंग टेबल पाहून राजेशाही डायनिंग रुम चेहऱ्यासमोर येतो. शिल्पाचे डायनिंग टेबल खूप मोठे असून तिथे सर्व कुटुंब एकत्र जेवण करते.
6 / 9
शिल्पा शेट्टीच्या घरात कित्येक डिझाइनर पेटिंग, अँटिक शो पीसपासून बरेच डेकॉरेशनच्या गोष्टी आहेत. ज्यामुळे तिच्या या आलिशान बंगल्याला चारचाँद लागले आहेत.
7 / 9
शिल्पा शेट्टीला राज कुंद्राने लग्नाच्या वाढदिवसाला बुर्ज खलिफामध्ये आलिशान घर गिफ्ट म्हणून दिले होते. जगातील सर्वात उंच इमारत बुर्ज खलिफाच्या 19व्या माळ्यावरदेखील शिल्पा व राजचे घर आहे. याशिवाय राज कुंद्राचे मुंबई, लंडन, बुर्ज खलिफाशिवाय नोएडा व इतर ठिकाणी घर आहे.
8 / 9
दरवर्षी वाढदिवस व अ‍ॅनिव्हर्सरीला राज कुंद्रा शिल्पाला महागडे गिफ्ट देतो. एकदा तर राज कुंद्राने शिल्पाला लंडनमध्ये कोटींचे घर गिफ्ट म्हणून दिले होते. ज्याचे नाव राजमहल आहे.
9 / 9
योगा आणि मेडिटेशन हे शिल्पाच्या डेली रूटीनचा एक भाग आहेत. तिच्या घराचं गार्डन खूप मोठं आहे आणि या ठिकाणी ती नेहमीच योगा करताना दिसते.
टॅग्स :शिल्पा शेट्टीसेलिब्रिटी