Join us

Shahrukh Khan : एकीकडे 'पठाण'चा वाद तर दुसरीकडे शाहरुखने उंचावले देशाचे नाव !

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2022 10:08 IST

1 / 9
शाहरुख खान हा ग्लोबल स्टार आहे. भारतातच नाही तर जगभरात त्याचे चाहते आहेत.
2 / 9
दुबईसारख्या देशाचा तर तो ब्रॅंड अॅंबेसिडर आहे.
3 / 9
आता नुकतीच शाहरुखने आणखी एक कामगिरी करत देशाचे नाव उंचावले आहे.
4 / 9
लंडनच्या एंपायर मॅग्झिननने (Empire Magzine) जगातील सर्वश्रेष्ठ अभिनेत्यांची यादी जाहीर केली आहे.
5 / 9
५० जणांच्या या यादीत शाहरुख खान एकमेव भारतीय अभिनेता आहे ज्याची निवड करण्यात आली आहे.
6 / 9
टॉम हॅंक्स (Tom Hanks), टॉम क्रुझ (Tom Cruez), मर्लिन मुनरो (Marilyn Monroe) केट विन्स्लेट (Kate Winslet), लिओनार्डो डी कॅप्रिओ (Lionardo dCapreo) सारख्या दिग्गज कलाकारांच्या यादीत शाहरुख खान हा एकमेव भारतीय आहे.
7 / 9
१९९२ मध्ये शाहरुख खानने दीवाना सिनेमातून बॉलिवुडमध्ये पदार्पण केले. डर, बाजीगर, अंजाम सारख्या सिनेमातून त्याने खलनायकाची भुमिका उत्तमरित्या साकारली.
8 / 9
तर दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे, कुछ कुछ होता है, दिल तो पागल है मधून शाहरुख रोमान्सचा बादशाह झाला.
9 / 9
शाहरुख खान सध्या अनेक अडचणींचा सामना करत आहे. वैयक्तिक आणि प्रोफेशनल आयुष्यात अनेक उलथापालथ झाल्यानंतर आता तो पठाण मधून धमाका करणार आहे.
टॅग्स :शाहरुख खान