IN PICS : ‘पठाण’साठी शाहरूख खानने घेतले इतके कोटी, आकडा वाचून डोळे पांढरे होतील!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2021 18:23 IST
1 / 10शाहरूख खानचे स्टारडम संपले असे कुणी म्हणत असेल तर ते चूक आहे. कारण आजही निर्माते शाहरूखला म्हणेल ती रक्कम देण्यास तयार आहेत. होय, ‘पठाण’ या आगामी सिनेमासाठी शाहरूखने घेतलेल्या रकमेचा आकडा वाचून तुम्हालाही हे पटेल.2 / 10शाहरूखचे मागचे काही सिनेमे दणकून आपटले. मात्र याऊपरही यशराजने शाहरूखला ‘पठाण’ या सिनेमासाठी 100 कोटी रूपये दिल्याचे कळतेय.3 / 10मीडिया रिपोर्टनुसार, एका सिनेमासाठी 100 कोटी रूपये घेणारा शाहरूख आता बॉलिवूडचा सर्वाधिक महागडा अभिनेता ठरला आहे. अक्षय कुमार वा सलमान खान कुणीही त्याच्या आसपासही नाहीत.4 / 10चित्रपट समीक्षक उमैर संधु यांनी एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये शाहरूखला ‘पठाण’साठी 100 कोटी रूपये चार्ज करण्यात आल्याचे म्हटले आहे. आता या पोस्टमध्ये किती तथ्य आहे, याबाबत आमचा कोणताही दावा नाही.5 / 10 ‘पठाण’ने 100 कोटींचा बिझनेस केला तर शाहरूख त्यातून 45 कोटी रूपये घेणार अशीही एक चर्चा आहे.6 / 10शाहरूखच्या या सिनेमात जॉन अब्राहमही दिसणार आहे. दीपिका पादुकोणही यात मुख्य भूमिकेत आहे.7 / 10बॉलिवूड किंग शाहरूख खानचे चाहते त्याला मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी आतूर झाले आहेत. साहजिकच ‘पठाण’कडे चाहते डोळे लावून बसले आहेत. 8 / 10सध्या दुबईमध्ये या सिनेमाचे शूटींग सुरु आहे आणि या सेटवरचे काही फोटो व व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहेत. 9 / 10 ‘पठाण’ या चित्रपटातील काही दृश्यांचे चित्रीकरण जगातील सर्वात मोठी इमारत म्हणून ओळखल्या जाणा-या बुर्ज खलिफामध्ये होत आहे. यापूर्वी अनेक चित्रपटांमध्ये बुर्ज खलिफा बाहेर दाखवण्यात आला आहे. मात्र पहिल्यांदाच या इमारतीच्या आतमध्ये एका भारतीय चित्रपटाचे चित्रीकरण केले जाईल.10 / 10यशराज बॅनरचा ‘पठाण’ सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित करतोय. चित्रपटाची रिलीज डेट अद्याप समोर आलेली नाही. त्यामुळे किंगखानला पाहण्यासाठी चाहत्यांना आणखी काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे.