By देवेंद्र जाधव | Updated: January 21, 2026 15:58 IST
1 / 7शाहिद कपूर हा बॉलिवूडमधला लोकप्रिय अभिनेता. शाहिद कपूरने २०१४ साली आलेल्या एका सिनेमात एकही रुपया न घेता काम केलं होतं.2 / 7हा सिनेमा होता 'हैदर'. विशाल भारद्वाज दिग्दर्शित या सिनेमात शाहिदने एकही रुपया न घेता काम केलं होतं. त्यामागचं कारणही शाहिदने सांगितलं.3 / 7'हैदर' सिनेमा हा शेक्सपिअरच्या गाजलेल्या हॅम्लेट या नाटकावर आधारीत आहे. कमिनेनंतर शाहीद विशाल यांच्यासोबत दुसऱ्यांदा काम करणार होता.4 / 7शाहिद त्यावेळी लोकप्रियतेच्या शिखरावर होता. त्यामुळे साहजिकच शाहिदचं मानधन त्यावेळी खूप जास्त होतं. 5 / 7शाहिदला त्यावेळी मानधन दिलं असतं तर सिनेमाचं बजेट कोलमडलं असतं. इतकंच नव्हे सिनेमाचं शूटिंग होणार नाही, अशीही परिस्थिती निर्माण झाली असती.6 / 7त्यामुळे शाहिद कपूरने सर्व गोष्टींचा विचार करुन एकही रुपया मानधन न घेण्याचं ठरवलं. शाहिदने 'हैदर' सिनेमात फुकट काम केलं.7 / 7२०१४ साली आलेला 'हैदर' हा सिनेमा खूप गाजला. शाहिद कपूर, इरफान, तब्बू, के के मेनन अशा अनेक तगड्या कलाकारांची या सिनेमात भूमिका आहे