मीरा राजपूतचे फोटो पाहून व्हाल ‘क्लीन बोल्ड’, बॉलिवूड अभिनेत्रींपेक्षा कमी नाही शाहिदची बायको
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2022 18:33 IST
1 / 102015 साली शाहिद कपूरने मीरा राजपूत नावाच्या मुलीशी लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता. 2 / 10मीरा कोण, कुठली हे तोपर्यंत कुणालाही माहित नव्हतं. बॉलिवूडच्या ग्लॅमर इंडस्ट्रीशी तिचा दूरदूरपर्यंत संबंध नव्हता.3 / 10पण पत्नी बनून मीरा शाहिदच्या आयुष्यात आली आणि अख्खी बदलली. अचानक लाईमलाईटमध्ये आली. 4 / 10आता तर मीरा राजपूतची स्वत:ची एक ओळख आहे. होय, स्टायलिश लुकमुळे ती सतत चर्चेत असते.5 / 10 कधी मीरा रॅम्पवर दिसते. कधी मोठ्या मॅगझिनच्या कव्हरपेजवर झळकते. अधूनमधून बॉलिवूडच्या इव्हेंटमध्ये मिरवताना दिसते. पण जेव्हा केव्हा दिसते तेव्हा तिची चर्चा होतेच.6 / 10 शाहिद कपूर जितका लोकप्रिय आहे, तितकीच त्याची पत्नी मीरा राजपूतही लोकप्रिय आहे. 7 / 10म्हणायला, मीराचा फिल्मी दुनियेशी काहीही संबंध नाही. पण तरीही तिची फॅन फॉलोइंग मोठी आहे. 8 / 10मीराचा शाही थाट, तिची स्टाईल बॉलिवूड अभिनेत्रींपेक्षा कमी नाही. अगदी बॉलिवूडच्या बड्या बड्या अभिनेत्रींना ती टक्कर देते.9 / 10मीरा सोशल मीडियावर कमालीची अॅक्टिव्ह आहे. तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर नजर टाकल्यास तुम्हाला मीराचे एक से बढकर एक स्टायलिश फोटो पाहायला मिळतील. लग्नानंतर झालेला बदल मीराच्या या फोटोंमध्ये पाहायला मिळतो. 10 / 102015 साली शाहिद आणि मीराने लग्नगाठ बांधली. लग्नानंतर वर्षभरातच शाहिदच्या घरी कन्यारत्न जन्मास आलं. यानंतर 2018 मध्ये शाहिदला पुत्ररत्न प्राप्त झालं.