Join us  

IN PICS : अमृता रावने मॅनेजरमुळे हातचा गमावला सलमानचा सिनेमा, इतक्या वर्षानंतर केला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2023 5:25 PM

1 / 10
विवाह फेम अमृता राव तुम्हाला आठवत असेलच. अमृताने 2002 मध्ये ‘अब के बरस’मधून बॉलिवूड डेब्यू केला होता. यांनतर ती ‘द लीजेंड ऑफ भगत सिंह’मध्ये दिसली होती. पण अमृताला खरी ओळख शाहिद कपूरसोबतच्या ‘इश्क विश्क’ आणि ‘विवाह’ या चित्रपटाने दिली.
2 / 10
अमृता राव बॉलिवूडमध्ये आली. पण तिची इमेज 'गर्ल - नेक्स्ट -डोर' अशीच बनून राहिली. म्हणावं तसं यशही तिला लाभलं नाही. करिअरच्या सुरूवातीला अगदी तिच्या मॅनेजरनंच तिला धोका दिला.
3 / 10
होय, अनेक वर्षांनंतर खुद्द अमृताने हा खुलासा केला आहे. अमृताने ‘कपल ऑफ थिंग्ज’ या आपल्या पुस्तकात एक धक्कादायक खुलासा केला आहे.
4 / 10
होय, सलमान खानच्या एका सुपरडुपर हिट सिनेमासाठी अमृताला विचारणा झाली होती. पण मॅनेजरमुळे अमृताने ही संधी गमावली. या सिनेमाचं नाव होतं ‘वॉन्टेड’.
5 / 10
तिने लिहिलंय, “काही महिन्यांपूर्वी मला समजलं की मला सलमान खानच्या एका चित्रपटासाठी अप्रोच करण्यात आलं होतं. त्यादरम्यान मी साऊथ सुपरस्टार महेश बाबूसोबत एका तेलुगू चित्रपटाचं शूटिंग करत होते.”
6 / 10
“शूटिंगनंतर, मी हॉटेलमध्ये प्रोडक्शन टीममधील एका व्यक्तीला भेटले होते, त्याने बोनीजी यांच्याबरोबर काम केले होते. त्यांनी माझी विचारपूस केली. तुमच्या तारखा जुळत असत्या तर तुम्ही सलमानच्या वॉन्टेडसाठी आमच्याबरोबर काम केलं असतं, असं ते मला म्हणाले... ”
7 / 10
पुढे ती म्हणाली, “माझ्या तारखा जुळत नव्हत्या, असं तुम्हाला कुणी सांगितलं असं विचारल्यावर ते म्हणाले, आम्ही तुमच्या मॅनेजरला फोन केला होता. पण, त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही बिझी आहात आणि तुमच्या तारखा फ्री नाही.”
8 / 10
“हे ऐकून मला धक्का बसला. माझ्या मॅनेजरने माझ्यापासून एवढी मोठी ऑफर लपवून ठेवली होती, हेच मला माहीत नव्हतं. एवढी मोठी ऑफर मिळाल्यावर तर काहीही करून वेळ काढला असता. शेवटी मी रागात मॅनेजरला कामावरून काढलं” असं अमृताने लिहिलं आहे.
9 / 10
2016मध्ये अमृताने आरजे अनमोलशी गुपचूप लग्न केलं. लग्नापूर्वी अमृता व अनमोल 7 वर्षे डेटींग करत होते. अर्थात अमृताने हे सगळं जगापासून लपवून ठेवलं होतं.
10 / 10
अमृता व अनमोलची भेट एका मुलाखतीदरम्यान झाली होती. या मुलाखतीनंतर दोघेही एकमेकांच्या जवळ आलेत. लग्नाच्या दोन वर्षांपूर्वी अनमोलला डेंग्यू झाला होता. याचदरम्यान दोघांची मैत्री प्रेमात बदलली.
टॅग्स :अमृता रावसलमान खान