Join us  

Bigg boss 17: प्राइज मनीपेक्षा जास्त आहे भाईजानची फी?; एका एपिसोडसाठी घेतले इतके कोटी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2024 2:07 PM

1 / 11
छोट्या पडद्यावरील वादग्रस्त आणि तितकाच चर्चेत राहिलेल्या बिग बॉस 17 चा ग्रँड फिनाले येत्या काही तासांमध्ये पार पडणार आहे. त्यामुळे सगळ्या प्रेक्षकांचं लक्ष यंदाच्या विनरकडे लागलं आहे.
2 / 11
सध्या सोशल मीडियावर बिग बॉस 17 शी निगडीत अनेक गोष्टी चर्चिल्या जात आहेत. यात खासकरुन बिग बॉसचा होस्ट अर्थात सलमान खान याचीही सगळीकडे चर्चा होतीये.
3 / 11
२०१० पासून सलमान या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करत आहे. इतकंच नाही तर त्याचा अंदाज प्रेक्षकांना विशेष भावतो.
4 / 11
सलमान या शोमध्ये स्पर्धकांना जितकं कम्फर्टेबल करुन त्यांच्याशी मैत्री करतो. त्याचप्रमाणे वेळप्रसंगी त्यांची कानउघडणीही जोरदार करतो.
5 / 11
सध्या नेटकऱ्यांमध्ये बिग बॉस 17 च्या ग्रँड फिनालेची चर्चा रंगली आहे. यात विजेत्याला मिळणारी प्राइज मनी किती असेल, सोबत मिळणाऱ्या भेटवस्तू कोणत्या असतील अशा कितीतरी गोष्टींची चर्चा रंगली आहे. यात खासकरुन सलमानचं मानधन किती असेल हा प्रश्न अनेकांना पडला आहे.
6 / 11
सलमान खान २०१० पासून या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करत असून या शोसाठी तो मानधनदेखील तितकंच तगडं घेतो.
7 / 11
बिग बॉसच्या प्रत्येक सीझननुसार सलमानचं मानधन वाढत जातं. यावेळी सुद्धा त्याने तितकंच मोठं मानधन स्वीकारल्याचं म्हटलं जात आहे.
8 / 11
मीडिया रिपोर्टनुसार, सीझन ६ पर्यंत सलमानने ठराविक रक्कम फी म्हणून स्वीकारली होती. मात्र, ७ व्या सीझननंतर त्याच्या मानधनात वाढ होऊ लागली. ७ व्या सीझनच्या वेळी प्रत्येक एपिसोड होस्ट करायचे त्यान ५ कोटी रुपये घेतले.
9 / 11
सलमानने सीझन ८ मध्ये ५. ५० कोटी रुपये, सीझन ९ मध्ये ७ कोटी रुपये आणि बिग बॉस १० मध्ये ८ कोटी रुपये फी घेतली होती. विशेष म्हणजे बिग बॉस ११ च्या वेळी त्याने घेतलेलं मानधन पाहता. त्याने इतर कोणत्याही शोसाठी मिळालेल्या मानधनाचे सगळे रेकॉर्ड मोडीत काढले. या सीझनसाठी त्याने ११ कोटी रुपये घेतले.
10 / 11
सलमानने बिग बॉस १२ साठी प्रत्येक एपिसोडसाठी १२ ते १४ कोटी रुपये आकारले. त्यानंतर सीझन १३ मध्ये हा आकडा १५. ५० च्या पार गेला. इतकंच नाही तर बिग बॉस १४ मध्ये, त्याने प्रत्येक एपिसोड २० कोटी रुपये घेतले होते. त्यानंतर या सीझनसाठी त्याने आकारलेली रक्कम ही प्राइज मनीपेक्षा जास्त असल्याचं म्हटलं जात आहे.
11 / 11
बिग बॉस 17 च्या विजेत्याला मिळणाऱ्या प्राइज मनीची रक्कम अद्याप तरी समोर आलेली नाही. परंतु, मागच्या काही वर्षांमधील ही रक्कम पाहता ती केवळ लाखांच्या घरात असते. त्यामुळे यावेळी सुद्धा सलमानचं मानधन जास्त ठरलं आहे. सलमानने यावेळी या सीझनच्या प्रत्येक एपिसोडसाठी तब्बल १२ कोटी रुपये मानधन स्वीकारलं आहे.
टॅग्स :बिग बॉससलमान खानटेलिव्हिजनटिव्ही कलाकार