आर्चीच्या नव्या लुकनं पुन्हा लावलं याड! रिंकू राजगुरूचे साडीतील फोटो पाहून पडाल प्रेमात
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2022 16:53 IST
1 / 8आपल्या सौंदर्य आणि अदाकारीनं चाहत्यांना याड लावणारी आर्ची अर्थात रिंकू राजगुरूचे हे ताजे फोटो तुम्ही पाहायलाच हवेत.2 / 8होय, रिंकूने पांढऱ्या फ्लोरल साडीतील काही मनमोहक फोटो शेअर केले आहेत आणि सध्या या फोटोंचीच चर्चा आहे.3 / 8जेव्हा स्वत:वर प्रेम करायला सुरूवात करता तेव्हा किमया घडते, असं सुंदर कॅप्शन देत रिंकूने साडीतील काही फोटो शेअर केले आहेत.4 / 8पांढरी शुभ्र साडी, त्याला गुलाबी फुलांची किनार... या साडीतील फोटोत रिंकू कमालीची सुंदर दिसतेय.5 / 8तिच्या या फोटोंवर चाहते फिदा आहेत. अनेकांनी हे फोटो पाहून रिंकूची श्रीदेवीशी तुलना केली आहे.6 / 8कडक, सुंदर, मनमोहक, माझी आर्ची..., अशा कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत. एका चाहत्याने तर स्वर्गाहून सुंदर अशी उपमा तिला दिली आहे.7 / 8रिंकूच्या या फोटोंवर कमेंट्सचा वर्षाव होतोय. फक्त 2 तासांत 35 हजारांवर लोकांनी या फोटोंना लाईक केलं आहे.8 / 8पहिल्याच चित्रटातून प्रेक्षकांना ‘सैराट’ करणाऱ्या रिंकूने कागर, मेकअप आणि झुंड या चित्रपटातूनही तिच्या अभिनयाची जादू दाखवली. आज रिंकूचा कलाविश्वात दबदबा असल्याचं पाहायला मिळतो.