‘आर्ची’चा नादच खुळा...! रिंकू राजगुरूचा खास दिवाळी लुक, पाहा फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2021 10:26 IST
1 / 7दिवाळीच्या निमित्ताने सोशल मिडीयावर सेलिब्रिटींचे पारंपरिक वेशभुषेतील फोटो पाहायला मिळत आहेत. ‘सैराट’ फेम रिंकू राजगुरुचे फोटोही झक्कास आहेत.2 / 7रिंकूने नुकतंच दिवाळी निमित्ताने खास फोटोशूट केलंय. यात रिंकूचा पारंपरिक लुक पाहायला मिळतोय.3 / 7या फोटोशूटमधील फोटोंमध्ये रिंकूने सुंदर नऊवार साडी नेसलीय. या पारंपारिक साजात जुन्या पद्धतीने तिने साडी परिधान केली आहे.4 / 7नऊवारी, गजरा, दागिने परिधान करून सुंदर पेहराव करण्यात आलाय. या फोटोशूटमधील नव्या सिरीजमधील फोटो तर सगळ्यांचं लक्ष वेधून घेत आहेत. 5 / 7याआधीही दिवाळीच्या शुभेच्छा देत तिने साडीतील फोटोत शेअर केले होते.6 / 7दिव्यांची आरास आणि रिंकू राजगुरूचा नखरा अशा तिच्या फोटोंनी चाहत्यांना घायाळ केलं होतं.7 / 7 सोशल मिडीयावर रिंकूचा मोठा चाहतावर्ग आहे. आणि या चाहत्यांना रिंकूचा हा दिवाळी लुक प्रचंड आवडलाय.