1 / 7'सैराट'फेम आर्ची म्हणजेच रिंकू राजगुरुने (Rinku Rajguru) काल २४ वा वाढदिवस साजरा केला. तिच्या अगणित चाहत्यांनी रिंकूवर शुभेच्छांचा वर्षाव केला.2 / 7रिंकू राजगुरुने नुकतेच तिच्या वाढदिवसाचे फोटो शेअर केले आहेत. यामध्ये ती अगदी साध्या लूकमध्ये दिसतेय.3 / 7फुल स्लीव्ह्ज व्हाईट स्वेटशर्ट, जीन्स आणि दोन वेण्या असा तिचा क्युट लूक आहे. गवतावर बसून हाताने हार्ट बनवत तिने सर्वांचे आभार मानलेत.4 / 7रिंकूसाठी खास चॉकलेट केकही मागवलेला दिसतोय. विविध रंगांचे फुगे लावून खोली सजवण्यात आली आहे. टेबलवर केक ठेवलेला आहे आणि रिंकू केक कट करताना दिसतेय.5 / 7यानंतर तिने गवतात बसून आणखी फोटो शेअर केलेत. यात तिने एकापेक्षा एक गोड पोज दिल्या आहेत. तसंच या फोटोंमध्ये तिची किलर स्माईल लक्ष वेधून घेत आहे.6 / 77 / 7रिंकू आगामी 'साडे माडे तीन'च्या सीक्वेलमध्ये दिसणार आहे. तसंच तिच्या इतर प्रोजेक्ट्सकडेही चाहत्यांचं लक्ष लागलं आहे.