Join us
Daily Top 2Weekly Top 5

कधी बेस्ट फ्रेन्ड होत्या सारा अली खान आणि रिया चक्रवर्ती, सुशांतमुळे तुटली होती दोघींची मैत्री?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2020 14:03 IST

1 / 9
सुशांत सिंह राजपूतच्या केसबाबत सतत काहीतरी नवीन गोष्टी समोर येत आहेत. यात सुशांत सिंहच्या लव्ह लाइफबाबत काही गोष्टी समोर आल्या होत्या. आता त्याच्या लव्ह लाइफबाबत काही नवीन गोष्टी समोर आल्या आहेत. ज्यात अभिनेत्री सारा अली खानचा उल्लेख आहे.
2 / 9
सुशांतचा मित्र सॅम्युअल हाओकिपची एक सोशल मीडिया पोस्ट चर्चेचा विषय ठरत आहे. ज्यात त्याने म्हटले आहे की, सुशांत आणि सारा एकमेकांवर खूप प्रेम करत होते. तसेच असाही उल्लेख आहे की, सारा अली खान आणि रिया चक्रवर्ती यांच्यात चांगली मैत्री होती. आता अशी चर्चा सुरू झाली की, सुशांतमुळेच रिया आणि साराची मैत्री तुटली होती. (Image Credit : mid-day.com)
3 / 9
मिड-डे च्या रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे की, २०१७ मध्ये सारा आणि रिया चांगल्या मैत्रिणी होत्या. त्या अनेकदा पार्टी आणि जिममध्ये एकत्र असायच्या. पण काही कालावधीनंतर दोघीही एकत्र दिसणं बंद झालं होतं.
4 / 9
रिपोर्टमध्ये दावा करण्यात आला आहे की, सारा त्यावेळी सुशांतसोबत 'केदारनाथ'चं शूटींग करण्यात बिझी होती. तर रियाही दुसऱ्या प्रोजेक्टमध्ये बिझी होती. त्यानंतर डिसेंबर २०१७ मध्ये त्यांची मैत्री तुटल्याची बातमी इंटरनेटवर आली होती. तसेच दोघांमध्ये सुशांतमुळे मिठाचा खडा पडल्याचीही चर्चा झाली होती.
5 / 9
ई-टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत सॅम्युअलने सारा आणि सुशांतच्या नात्यावर डिटेल माहिती दिली. सॅम्युअलने पोस्टमध्ये लिहिले की, 'सोनचिडिया' बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाल्यानंतर साराने सुशांतसोबत ब्रेकअप केलं होतं. त्याने शंकाही व्यक्त केली की, तिने असं एखाद्या बॉलिवूड माफियाच्या सांगण्यावरून केलं होतं का?
6 / 9
सॅम्युअलने हेही म्हणाला की, सारा चांगली मैत्रीण होती. तो म्हणाला की, 'आम्ही सगळे सोबत फिरत होतो. मी तिच्यावर आरोप लावत नाहीये. कारण कुणी मला लिखित दिलेलं नाही की, मी कुणाच्या तरी प्रेशरखाली ब्रेकअप केलं'.
7 / 9
सॅम्युअलने सांगितले की, सारा आणि सुशांतचं ब्रेकअप झाल्यावर रिया सुशांतच्या आयुष्यात आली.
8 / 9
त्याने लिहिले की, 'मला नेहमीच वाटत होतं की, सारासोबत सुशांतचं चांगलं बॉंडींग होतं. जसे की मी पोस्टमध्ये लिहिले की, दोघेही एकमेकांचा सन्मान करत होते. दोघांना एकत्र पाहून एखाद्या सिनेमासारखं वाटायचं. त्यांची एनर्जी फार प्युअर होती.
9 / 9
सारा अली खान आणि रिया चक्रवर्तीचे जिममधील काही फोटो सोशल मीडियात व्हायरल झाले आहेत. ज्यात दोघींची चांगली बॉंडींग स्पष्टपणे दिसत आहे.
टॅग्स :सारा अली खानरिया चक्रवर्तीसुशांत सिंग रजपूत