Join us  

Rang Maza Vegla : अखेर पुन्हा एकदा कार्तिक आणि दीपानं बांधली लग्नगाठ, फोटो झाले व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2023 1:29 PM

1 / 9
गेले कित्येक दिवस ज्या दिवसाची प्रेक्षक आतुरतेने वाट पहात होते तो दिवस अखेर दीपा-कार्तिकच्या आयुष्यात आलाय. गैरसमज आणि त्यातून निर्माण झालेल्या दुराव्यामुळे दीपा-कार्तिकने आयुष्यातले महत्त्वाचे क्षण गमावले.
2 / 9
कार्तिकी आणि दीपिका या दोन्ही मुलींच्या जन्माचा आनंदही दोघांना एकत्र साजरा करता आला नाही. दोन्ही लेकी दोन वेगळ्या घरांमध्ये लहानाच्या मोठ्या झाल्या. मात्र आता गैरसमजाचं मळभ दूर झालंय.
3 / 9
दीपा-कार्तिकच्या आयुष्यात पुन्हा सुखाचे क्षण येऊ पहात आहेत. आपापसातले हेवेदावे विसरुन दोघंही पुन्हा एकदा विवाहबंधनात अडकणार आहेत.
4 / 9
इनामदार कुटुंबात दीपा-कार्तिकच्या लग्नाची जय्यत तयारी सुरु झाली असून मेहंदी, हळद, संगीत आणि लग्न सगळं अगदी साग्रसंगीत पार पडले आहे.
5 / 9
दरम्यान दीपा कार्तिकचं लग्नदेखील थाटामाटात पार पडले असून त्यांच्या लग्नाचे फोटो समोर आले आहेत.
6 / 9
या फोटोत दीपा आणि कार्तिक वधू वराच्या गेटअपमध्ये दिसत आहेत. त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत.
7 / 9
त्यांच्या संगीत सेरेमनीचे फोटो देखील सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत.
8 / 9
दीपिका आणि कार्तिकीच्या पुढाकारानेच दीपा कार्तिकचं लग्न पार पडत आहे. या दोघीच आमची लगीनगाठ बांधणार आहेत. त्यामुळे हे लग्न खूपच स्पेशल आहे, असे कार्तिकची भूमिका साकारणारा अभिनेता आशुतोष कुलकर्णीने म्हटले.
9 / 9
दीपा कार्तिकचे चाहते त्यांचा लग्नसोहळा पाहण्यासाठी खूप उत्सुक आहेत.
टॅग्स :स्टार प्रवाह