Join us  

'रंग माझा वेगळा'मधील अश्विनीचा रॉयल कारभार..! फोटोंना मिळतेय चाहत्यांची पसंती

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2022 8:44 PM

1 / 11
स्टार प्रवाह (Star Pravah) वाहिनीवरील लोकप्रिय मालिका 'रंग माझा वेगळा' (Rang Maza Vegla) सध्या रंजक वळणावर आली आहे. या मालिकेचे कथानक आणि पात्रांना रसिकांची पसंती मिळताना दिसते आहे.
2 / 11
रंग माझा वेगळा या मालिकेत अश्विनीची भूमिका अभिनेत्री वैशाली राहुल भोसले (Vaishali Rahul Bhosale) हिने साकारली आहे.
3 / 11
ती सोशल मीडियावर सक्रीय असून ती या माध्यमातून चाहत्यांना अपडेट देत असते. तसेच ती फोटो शेअर करत असते.
4 / 11
अभिनेत्री वैशाली राहुल भोसले हिने नुकतेच काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.
5 / 11
या फोटोत तिचा रॉयल अंदाज पाहायला मिळत आहे.
6 / 11
वैशाली भोसले हिने फोटो शेअर करत लिहिले की, साज शृंगार लेऊनी नटूनी थटूनी सजले मी मजसाठी..वैशु
7 / 11
वैशालीचा रॉयल लूक चाहत्यांना खूप भावला आहे. तिने हे फोटोशूट सातारा येथे केले आहे.
8 / 11
यावेळी तिने घोड्यावर बसून फोटोशूट केले आहे.
9 / 11
वैशालीचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत.
10 / 11
तर वैशाली राहुल भोसले हिच्या प्रोफेशनल लाइफबद्दल सांगायचे तर तिने मालिका, नाटक या माध्यमात काम केले आहे.
11 / 11
वैशालीला रंग माझा वेगळा या मालिकेतून चांगलीच लोकप्रियता मिळाली आहे. तिने याशिवाय चंद्र आहे साक्षीला, तू माझा सांगाती, लक्ष्य आणि बऱ्याच मालिकेत काम केले आहे. तसेच ती रमेश मोरे लिखित आणि दिग्दर्शित टॉपर या सीरिजमध्येही झळकली आहे.
टॅग्स :स्टार प्रवाह