Join us  

माधुरी दीक्षित ते इम्रान हाश्मी! 'या' 5 कलाकारांना किसिंग सीन दिल्याचा होतोय पश्चाताप

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2023 4:00 PM

1 / 10
करिश्मा कपूर - बॉलिवूडमध्ये अनेक सुपरहिट सिनेमा देणाऱ्या करिश्मा कपूरने राजा हिंदुस्तानी या सिनेमा किसिंग सीन दिला होता.
2 / 10
अभिनेता आमिर खानसोबत हा सीन शूट झाला होता. मात्र, हा सीन केल्याचा आजही करिश्माला पश्चाताप होतो. या सीनचं तीन दिवस शुटिंग सुरु होतं.
3 / 10
कंगना रणौत - अभिनयशैलीसह स्पष्टवक्तेपणासाठी ओळखली जाणारी कंगना रणौत हिनेदेखील एका सिनेमात किसिंग सीन दिला आहे.
4 / 10
शाहिद कपूर याच्यासोबत कंगनाने रंगून या सिनेमात किसिंग सीन दिला होता. एका मुलाखतीमध्ये तिने हा सीन करताना भयानक अनुभव आल्याचं म्हटलं होतं.
5 / 10
रणबीर कपूर- बॉलिवूडचा चॉकलेट हिरो म्हणून रणबीर कपूरकडे पाहिलं जातं. विशेष म्हणजे आजवर रणबीरचं नाव अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं आहे.
6 / 10
जग्गा जासूस या सिनेमात रणबीरने कतरिना कैफसोबत किसिंग सीन दिला होता. परंतु, हा सीन त्यांच्या ब्रेकअपनंतर शूट झाला होता. त्यामुळे हा सीन केल्याचा त्याला आजही पश्चाताप होतो.
7 / 10
माधुरी दीक्षित - बॉलिवूडची धकधक गर्ल माधुरी दीक्षित हिने वयाच्या २० व्या वर्षी पहिला किसिंग सीन दिला होता. हा सीन करताना माधुरी प्रचंड रडली होती.
8 / 10
दयावान या सिनेमात तिने किसिंग सीन दिला होता. हा सीन केल्यानंतर तिला बराच पश्चाताप झाला होता.
9 / 10
इम्रान हाश्मी- सीरियल किसर म्हणून इम्रान हाश्मीकडे पाहिलं जातं. मात्र, मर्डर सिनेमात त्याने दिलेल्या किसिंग सीनचा त्याला आजही पश्चाताप होतो.
10 / 10
या सिनेमात किसिंग सीन शूट करत असताना त्याला प्रचंड विचित्र अनुभवाला सामोरं जावं लागलं होतं.
टॅग्स :बॉलिवूडसेलिब्रिटीसिनेमामाधुरी दिक्षितकरिश्मा कपूररणबीर कपूर