Join us

रामलीला ते कबीर सिंग...! या सिनेमांसाठी सुशांत सिंग राजपूत होता First Choice

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2020 17:56 IST

1 / 10
सुशांत सिंग राजपूत आता या जगात नाही़ त्याच्या सारख्या गुणी अभिनेत्याने आत्महत्या का करावी, हा प्रश्न छळणारा आहे. काहींच्या मते, तो बॉलिवूडच्या नेपोटिझमचा बळी ठरला तर काहींच्या मते, तो डिप्रेशनमध्ये होता. खरे सांगायचे तर सुशांतचे फिल्मी लाईफमध्ये अनेक चढऊतार आलेत. काहीवेळा त्याला चित्रपटातून रिप्लेस करण्यात आले तर काही चित्रपट त्याने स्वत: सोडले. सुशांतच्या हातून निसटलेल्या अशाच काही चित्रपटांवर एक नजर...
2 / 10
रामलीला - संजय लीला भन्साळींच्या या चित्रपटात रणवीर कपूर व दीपिका पादुकोणची जोडी दिसली होती. पण सुशांत या सिनेमासाठी भन्साळींची पहिली पसंत होता. मात्र त्याने या चित्रपटाला नकार दिला व हा चित्रपट रणवीरच्या झोळीत पडला.
3 / 10
फितूर - या सिनेमासाठीही सर्वप्रथम सुशांतला विचारणा झाली होती. दिग्दर्शक अभिषेक कपूरने तर कामही सुरु केले होते. मात्र काम सुरु होणार तोच ऐनवेळी सुशांतने हा सिनेमा सोडला होता. डेट्स नसल्याचे कारणाने त्याने हा निर्णय घेतला होता.
4 / 10
बेफिक्रे ‘शुद्ध देसी रोमान्स’ या सिनेमानंतर आदित्य चोप्रा पुन्हा एकदा ‘बेफिक्रे’मध्ये सुशांत व वाणी कपूरला संधी देण्याच्या विचारात होता़ मात्र अचानक आदित्यने आपला निर्णय बदलला व यात रणवीर सिंग दिसला.
5 / 10
हाफ गर्लफ्रेन्ड - या चित्रपटासाठी सर्वप्रथम सुशांत व क्रिती सॅनन या दोघांना कास्ट करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र सुशांतने या चित्रपटाला नकार दिला. यानंतर वरूण धवनला हा सिनेमा ऑफर केला गेला. त्यानेही नकार दिल्यावर यात अर्जुन कपूरची वर्णी लागली होती.
6 / 10
कबीर सिंग - मीडियाचे मानाल तर कबीर सिंग हा सिनेमाही सर्वप्रथम सुशांतला ऑफर केला गेला होता.
7 / 10
रॉ- या चित्रपटात जॉन अब्राहम लीड भूमिकेत दिसला. पण सर्वप्रथम सुशांतला या सिनेमासाठी विचारणा झाली होती.
8 / 10
अंधाधुन - अंधाधुन हा सिनेमा हिट झाला. चर्चा खरी मानाल तर श्रीराम राघवन यांनी सर्वप्रथम सुशांतला या सिनेमासाठी विचारले होते.
9 / 10
आशिकी 2 - आशिकी 2साठी सुशांतने ऑडिशनही दिले होते. मात्र यानंतर या सिनेमासाठी आदित्य राय कपूरचे नाव फायनल झाले.
10 / 10
सडक 2 -या सिनेमातही सुशांत दिसता दिसता राहिला. आदित्य राय कपूरने पुन्हा एकदा त्याला रिप्लेस केले.
टॅग्स :सुशांत सिंग रजपूत