ना सलमान, शाहरुख, ना दीपिका; 'या' सेलिब्रिटींना मिळालं नाही राम मंदिर सोहळ्याचं निमंत्रण
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2024 12:50 IST
1 / 10ज्या दिवसाची लोक वर्षानुवर्षे वाट पाहत होते तो दिवस आज आला आहे. अयोध्येतील राम मंदिरात आज प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडत आहे. या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी अनेक आले आहेत तर काही आधीच पोहोचले आहेत. 2 / 10राजकारण्यांपासून ते बॉलिवूड स्टार्सपर्यंत सर्वांनाच राम मंदिराच्या भव्यदिव्य सोहळ्याचं साक्षीदार व्हायचं आहे. पण असे काही बॉलिवूड सेलिब्रिटी आहेत ज्यांना राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा भाग होण्यासाठी आमंत्रित करण्यात आलं नाही. 3 / 10शाहरुख खानपासून ते दीपिका पादूकोनपर्यंत असे अनेक सेलिब्रिटी आहेत ज्यांना निमंत्रण पाठवण्यात आलेले नाही. अमिताभ बच्चन, रजनीकांत, रणबीर कपूर, आलिया भट्ट, कतरिना कैफसह अनेक कलाकार अयोध्येला पोहोचले आहेत.4 / 10भव्यदिव्य सोहळ्यासाठी अयोध्यानगरी नववधूप्रमाणे सजली आहे. राम मंदिराच्या सोहळ्यासाठी पोहोचलेल्या सेलिब्रिटींचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत. 5 / 10ई-टाइम्सच्या वृत्तानुसार, शाहरुख खानला निमंत्रण पाठवण्यात आलेले नाही. हे निमंत्रण न पाठवण्यामागचं कारण अद्याप समोर आलेलं नाही.6 / 10राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात सलमान खान देखील सहभागी होऊ शकला नाही. त्यालाही निमंत्रित करण्यात आलेले नाही. 7 / 10सलमान खानसोबतच आमिर खानला देखील या सोहळ्यासाठी निमंत्रित करण्यात आलेलं नाही.8 / 10बॉलिवूडचं सर्वात रोमँटिक कपल दीपिका पादूकोन आणि रणवीर सिंह यांनाही आमंत्रित करण्यात आलेले नाही. 9 / 10दीपिका-रणवीर यांच्या प्रमाणेच सैफ अली खान आणि करीना कपूरही यात सहभागी होणार नाहीत.10 / 10अभिनेत्री कंगना राणौत प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात सहभागी होण्यासाठी अयोध्येत पोहोचली होती. अयोध्येतील हनुमान गढीमध्ये तिने झाडू मारला. कंगनाचा झाडू मारतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.